
सही ती सही, आमच्या बापाची सही,
जणू मोती अक्षरांचे , पेरीत जाई,
लक्ष सकल जनांचे, वेधून घेई , हृदयांती जगभरातील उपेक्षितांच्या, कायमचे ठाण मांडून जाई.!
सही ती सही,
आमच्या बापाची सही,
तिने जाणले, कोटी कोटींचे हाल,
झाली ती दिन दुबळ्या अन गोर गरिबांची ढाल,
होऊनी मुक नायक, सोलून काढली जात्यंद्याची खाल.!
सही ती सही,
आमच्या बापाची सही,
मिळवले तिने, मतदार राखीव संघ, गरजेचे, हक्काचे,
बसता गांधीजी, प्राणांतिक उपोषणाला,
दिली सहमती नाराजीने,
पुणे कराराला अन वाचवले प्राण
गांधीजींचे.!
सही ती सही,
आमच्या बापाची सही,
जाणल्या तिने, शृंखला बंधनांच्या,
आणि फरपट स्त्रियांची,
वाट केली मोकळी संविधानात,
हक्काची, शिक्षणाची, समानतेची.!
वाट केली मोकळी संविधानात,
हक्काची, शिक्षणाची, समानतेची .!!
वाट केली मोकळी संविधानात,
हक्काची, शिक्षणाची, समानतेची.!!!
जयभीम.
अरुण निकम,
9333249487.
मुंबई.
दिनांक 22/04/2025.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत