कालाम सुत्त – मानव मुक्तीचा जाहीरनामा
तथागत भगवान बुद्धांची कल्याणकारी शिकवण गावा-गावात पसरु लागली होती. त्यांची प्रवचने ऐकण्यासाठी श्रेष्ठी आणि ब्राह्मण त्यांच्याजवळ येत होते. असेच एकदा भगवान बुद्ध केसमुत्ती नावाच्या गावाला गेले असता, त्या गावातील कालामांनी भगवान बुद्धांना योग्य तो उपदेश करावा अशी विनंती केली. तेव्हा भगवान म्हणाले ..
” ‘एथ तुम्हे, कालामा, मा अनुस्सवेन, मा परम्पराय, मा इतिकिराय, मा पिटक सम्पदानेन, मा तक्कहेतु, मा नयहेतु, मा आकार परिवितक्केन , मा दिट्ठिनिज्झानक्खन्तिया, मा भब्बरूपताय, मा समणो नो गरूति। यदा तुम्हे, कालामा, अत्तनाव जानेय्याथ – ‘इमे धम्मा अकुसला, इमे धम्मा सावज्जा, इमे धम्मा विञ्ञुगरहिता, इमे धम्मा समत्ता समादिन्ना अहिताय दुक्खाय संवत्तन्ती’’’ति, अथ तुम्हे, कालामा, पजहेय्याथ। “
मराठी अर्थ –
१. हि गोष्ट वारंवार ऐकली आहे म्हणुन ती स्वीकारु नका.
२. हि गोष्ट परंपरेने मानली जात आहे म्हणुन ती स्वीकारु नका.
३. हि गोष्ट आमच्या धर्म ग्रंथाच्या अनुकुल आहे म्हणुन ती स्वीकारु नका.
४. हि गोष्ट तर्कसंगत आहे म्हणुन ती स्वीकारु नका.
५. हि गोष्ट न्यायसंगत आहे म्हणुन ती स्वीकारु नका.
६. हि गोष्ट आमच्या मताच्या अनुकुल आहे म्हणुन ती स्वीकारु नका.
७. सांगणाऱ्याचे व्यक्तीत्व व त्याचे व्यक्तीमत्व आकर्षक आहे म्हणुन त्याची गोष्ट स्वीकारु नका.
८. सांगणारा श्रेष्ठी किंवा ब्राह्मण हा पुज्यनीय आहे म्हणुन त्याची गोष्ट स्वीकारु नका .
तुम्ही सत्याला आपल्या अनुभवाने जाणा, कोणत्या गोष्टी कुशल आहेत, निर्दोष आहेत, त्यानुसार चालण्यामुळे आपले हित होईल, आपल्याला सुख प्राप्त होईल, त्याचाच स्वीकार करा. जे सत्य आपल्या अनुभवांनी जाणले गेले, आणि बघितले की हे कुशल आहे, ते केवळ जाणुनच राहु नका, तर त्यानुसार आचरण करा तरच तुमचे कल्याण होईल.
👉 जर तर्कच सर्वश्रेष्ठ असता तर भगवान बुध्दांना उपदेश करण्याची आवश्यकता काय असती ?
प्रत्येक गोष्ट तर्कावर सुटु शकत नाही. आणि सत्यही तर्काच्या बळावर गवसणार नाही. या जगात वेगवेगळ्या स्वभावाचे वेगवेगळ्या बुद्धीचे लोक राहत असतात जर प्रत्येक जण आपापल्या तर्कावरच विश्वास ठेवायला गेला तर जगातुन सत्य नाहीसे होईल. अंधविश्वासही वाढेल..
चांगल्या मनुष्याचा तर्क चांगला तर वाईट मनुष्याचा तर्क वाईटच असेल. परंतु सत्यापेक्षा ते वेगळेच असेल. ज्याचे त्याचे तर्क ज्याच्या त्याच्या बुद्धीनुसारच असतील शिवाय आपण एक गोष्ट लक्षात घ्यायला हवे की, सामान्य मानवाचे इंद्रिय हे मर्यादीत असतात. प्रत्येक गोष्ट ते त्याच्या तर्कावर सोडवू शकणार नाहीत. ( उदा. मानवाचे कान अल्ट्रासोनीक साऊंड ऐकु शकत नाहीत., तसेच कित्येक सूक्ष्म जीव आपल्या डोळ्याने तो पाहु शकत नाही, हे सर्व मानवाच्या इंद्रियांच्या मर्यादा आहेत. )
या सर्वांपेक्षाही बुद्धांचा धम्म इंद्रिय मानतात ते म्हणजे आपले मन. सामान्य मानवाच्या मनाचीही शक्ती इतर इंद्रियांप्रमाणे मर्यादीत आहे. त्यामुळे केवळ तर्कावर तो सत्याचा शोध लावु शकणार नाही. मनाची शक्ती वाढविण्यासाठी एक मार्ग सांगितला आहे. त्याने असा कुठेही दावा केला नाही की त्याचा मार्ग हा एकमेव मार्ग आहे. परंतु त्याचा हा धम्ममार्ग एकमेव मध्यम मार्ग आहे एवढे मात्र नक्की.
” बुद्ध हे मानवाचेच विकसीत रुप आहे. मानवाच्या मनाच्या विकासाची शेवटची पायरी म्हणजे बुद्धत्व होय. “
भगवान गौतम बुद्धांनी जे काही सांगितले ते सर्वकाही स्वतःच्या अनुभवातुन, तर्कावरुन नव्हे.! आणि त्यांचा असा दावा आहे की कोणीही हा सिद्धांत स्वतः अनुभवुन पाहु शकतो.
नमोबुध्दाय ! जयभीम !
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत