महाराष्ट्रमुख्यपानराजकीयविचारपीठ

धंदे कष्टांचे आणि फसवणुकीचे !

©️डी. उषा

खूप वर्ष झाली.
आमच्या घरी पूजा होती.
मोठा भाऊ पूजेला बसला होता.
गुरुजींनी सांगितलं : तुमच्या सौ ना बोलवा.
भाऊ म्हणाला : माझं लग्नं झालं नाहीये.
गुरुजी म्हणाले : शुभकार्य एकट्याने करता येत नाही. पत्नी सोबत हवी !!

मग त्यांनी एक सुपारी त्याच्या सोवळ्यात कमरेला बांधली. प्रॉब्लेम सुटला. आठ आण्याच्या सुपारीने पत्नीची जागा घेतली.

पूजा मांडताना कुळदैवताची मूर्ती मागितली. ती पण आमच्या कडे नव्हती. मग सेपरेट विड्याच्या पानावर दुसरी सुपारी मांडून कुळदैवत मानलं गेलं.

विधिवत पूजा सुरू झाली.
गुरुजींनी अत्तर मागितलं.
अत्तर आणायला विसरलो होतो.
गुरुजींनी अक्षता वाहून अक्षताम् समर्पयामि म्हणून वेळ मारून नेली.

यथासांग पूजा झाल्यावर गुरुजींनी गाऱ्हाणं घातलं :
देवा म्हाराजा ! पूजा करताना काय चुकलं माकलं असेल तर यजमानांना क्षमा कर !!

हे बरंय.
पूजा गुरुजी सांगणार !
मंत्र तेच म्हणणार !
दक्षिणा तेच घेणार !
शिधा तेच नेणार !

आणि चुका आमच्या होणार म्हणून माफी पण तेच मागणार !!

जेवण झाल्यावर गुरुजींनी चंची उघडली,
सुपारी कातरली आणि पान रंगवले.

अवघ्या अर्ध्या तासात मानाची सुपारी अडकित्त्यात आली.

मी फक्तं गुरुजींकडे बघून हसलो.

आता समजा ,

  • घरी सुतार आला .
    त्याच्याकडे करवत नसेल तर हातोड्यावर पाणी शिंपडून त्याची करवत होत नाही.
  • घरी मेकॅनिक आला.
    त्याच्याकडे पान्हा नसेल तर स्क्रू ड्रायव्हर वर तांदूळ टाकून तो त्याचा पान्हा बनवू शकत नाही.
  • तुमचा आवडीचा विश्वासू डॉक्टर थर्मामीटरवर तांदूळ टाकून त्याचे इंजेक्शन बनवू शकत नाही.
  • कपडे शिवणारा शिंपी सुई वर तांदूळ टाकून कात्री बनवू शकत नाही.
  • तुमचा व्यापारी गव्हाची टंचाई आली म्हणून तांदळाचे गहू बनवू शकत नाही. थोडक्यात , कुठल्याच धंद्यात अशी लबाडी , बनवाबनवी करता येत नाही. परंतु गुरुजींच्या धंद्यात मात्र सुपारीची पत्नी बनवून लबाडी करण्याची राजरोस सोय आहे ! आता जी मंडळी पत्नी , कुळदैवत म्हणून ते सुपारी मांडू शकतात, अत्तर म्हणून तांदूळ वाहू शकतात , ती काय काय करू शकतात ते नीट ऐका ! हीच मंडळी ठाकरेंची सेना शिंदेंच्या नावावर करू शकतात. निवडणूक चिन्हं, खरा पक्ष, खरी सेना तेच ठरवू शकतात.

सैनिकाला सेनाप्रमुख बनवणं म्हणजे सुपारीला पुजणं !

त्यांना हा कॉन्फिडन्स कित्येक पिढ्यांचा आहे.

पवार साहेबांची पार्टी तेच बिनधास्त दादांच्या नावावर करू शकतात.

जर तुम्ही सुपारीला कुळदैवत मानू शकता तर दादांना मोठे साहेब मानण्यात कसली अडचण आहे ?

आज त्याच लोकांच्या हाती आपण देश दिलाय .

ते इकॉनॉमी वर बोलणार नाहीत.
खरा डेटा लपवणार.
चीन किती घुसलाय ते सांगणार नाहीत.
मणिपूर वर भाष्य करणार नाहीत.

ते फक्त
अमृतकाल / विश्वगुरू / अकरावा अवतार अशा फोकनाड मारणार.

ते तुम्हाला थापा मारत राहणार.
आणि तुम्ही त्यांच्या थापा मनोभावे ऐकत राहायच्या !!!!

©️डी. उषा

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

4 Comments

  1. खूप छान.. अतिशय मार्मिक आणि तर्कशुध्द लिखाण.
    अनेक धन्यवाद ????????????

  2. खूप छान.. अतिशय मार्मिक आणि तर्कशुध्द लिखाण.
    अनेक धन्यवाद ????????????

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!