मानव अधिकार भगवान बुद्धाच्या तत्वानुसार आहेत_ॲड एस के भंडारे

डॉ बाबासाहेब आंबेडकर मोफत सहाय्यता व सल्ला केंद्राचे उद्घाटन
मुंबई (10/12/2025) युनोस्कोने 10 डिसेंबर 1948 रोजी जागतिक मानव अधिकार प्रत्येक माणसाला समानता , स्वतंत्रता व यातनेपासून सुरक्षा, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक अधिकार दिले आहे तो सरकार किंवा आणि कोणी द्यायचा नसून ते जन्मजात अधिकार आहेत.हे भगवान बुद्धाच्या तत्वानुसार असून तेच भारतीय संविधानात न्याय, स्वतंत्रता, समता आणि बंधुता व्दारे भारतातील सर्वांना धर्म, जात, लिंग, जन्मस्थान इत्यादीनुसार कोणताही भेद भाव न ठेवता सर्वांना मूलभूत अधिकार दिले आहेत. आता या विचारसरणीच्या व संविधानाच्या विरोधातील लोक सत्तेवर बसले आहेत त्यामुळे संविधान समर्थकाला बरोबर घेऊन संविधान विरोधकाला सत्तेवर येऊ देता कामा नाही असे प्रतिपादन दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया ट्रस्टी/राष्ट्रीय उपाध्यक्ष व समता सैनिक दलाचे स्टाफ ऑफिसर ॲड एस के भंडारे यांनी आंतरराष्ट्रीय मानव अधिकार दिना निमित्त दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया झोन 4 जिल्हा शाखेच्यावतीने बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर मोफत सहाय्यता व सल्ला केंद्र, परिवर्तनशील संस्था,दामूनगर , कांदिवली पूर्व येथे उद्घाटन प्रसंगी केले. ॲड भंडारे व अंजली साळवे यांच्या हस्ते बी एस आय मिशन 25 नुसार पहिल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर मोफत सहाय्यता व सल्ला केंद्राचे व नाम फलकाचे उद्घाटन करण्यात आले.
पुढे ॲड भंडारे म्हणाले की, या केंद्रात डॉक्टर, वकील, इंजिनिअर, सरकारी व बँक अधिकारी इत्यादींशी समन्वय साधून गोर गरीब संविधान समर्थक सर्व एस सी, एस टी, ओ बी सी, अल्पसंख्याक महिला, पुरुष, युवक, युवतीं इत्यादींना मोफत सेवा देण्याचे काम भारतीय बौद्ध महासभा करणार असल्याचे सांगून त्यानुसार जिल्हा शाखेने कामाला लागावे असे सूचित केले.
कार्यक्रमाच्या सुरवातीला डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आनंदराज आंबेडकर यांच्या सासू प्रेमा पांडुरंग साळवी यांचे अल्पशा आजाराने निधन झाल्याबद्दल श्रद्धांजली अर्पित करण्यात आली. यावेळी मुंबई प्रदेश सरचिटणीस दयानंद बडेकर ,जिल्हा अध्यक्ष प्रमोद पगारे , उल्हासनगरच्या माजी नगरसेविका अंजलीताई साळवे यांनी शुभेच्छा दिल्या, तसेच डॉ अभिजित साळवे व डॉ रिमा साळवे प्रामुख्याने उपस्थित होत्या. सूत्रसंचालन जिल्हा सरचिटणीस व परिवर्तनशील संस्थेचे सचिव पंजाबराव गवई यांनी केले.या कार्यक्रमास विभागातून महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत



