शौर्य दिनानिमित्त अकोला ते भीमा कोरेगाव मोटर सायकल रॅली करीता अकोला जिल्हा युवा आघाडी टीम रवाना….

वंचित बहुजन युवा आघाडी महाराष्ट्र प्रदेश वतीने सुजात दादा आंबेडकर यांच्या नेतृत्वात ३१ डिसेंबर २०२५ रोजी पुणे ते भिमा कोरेगाव शौर्य स्तंभ पर्यंत आयोजित अभिवादन बाईक रॅली मध्ये सहभागी होण्यासाठी अकोला ते पुणे असा मोटर सायकलने सहभागी होण्यासाठी आज वंचित बहुजन युवा आघाडी अकोला जिल्हा टीम मोटर सायकल घेऊन जिल्हाध्यक्ष श्रीकांत घोगरे पाटील आणि जिल्हा महासचिव राजकुमार दामोदर यांच्या नेतृत्वाखाली यशवंत भवन अकोला येथून दुपारी १२ रवाना झाले. वंचित बहुजन युवा आघाडी प्रदेश महासचिव राजेंद्रभाऊ पातोडे ह्यांनी रॅलीला झेंडा दाखविला.ह्यावेळी राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य अरुंधतीताई सिरसाठ, जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे, महिला आघाडी अध्यक्षा आम्रपाली खंडारे, महानगर महिला आघाडी अध्यक्षा वंदनाताई वासनिक यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
बुलढाणा येथून जिल्हाध्यक्ष अनिल वाकोडे ह्याचे नेतृत्वात बुलढाणा युवा आघाडी सहभागी होणार आहेत.पुढे औरंगाबाद, अहिल्यानगर आणि मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र येथून युवा आघाडीचे कार्यकर्ते ह्या रॅली मध्ये सामील होऊन ३१ डिसेंबरच्या रॅली साठी रवाना होणार आहे.जवळपास ५५० किलोमिटर मोटर सायकल घेऊन अकोल्यातून युवा आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते निघाले आहेत.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत



