निर्लज्जपणाचा कळसच

समस्त सुजाण वाचकांस जय संविधान, जय जिजाऊ, जयभीम।
आपल्या भारत देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचे विद्यमान सरन्यायाधीश मा. भुषण गवई साहेब यांचेवर सर्वोच्च न्यायालयात एक मनुवादी नतद्रष्ट ब्राह्मण वकिलाने बुट फेकण्याची निर्लज्ज कृती म्हणजे निर्लज्जपणाचा कळसच म्हणावे लागते. कारण काय तर म्हणे एका देवाविषयीच्या याचिकेच्या सुनावणी प्रसंगी सर्वोच्च न्यायालयात मा. सरन्यायाधीश गवई साहेबांनी सनातन्यांच्या विष्णुदेवाचा अपमान केला असा आरोप. खरेतर न्यायालये देवासाठी नसून मानवांसाठी आहेत. येथे मला प्रसिध्द मानवतावादी कवी ‘विंदा करंदीकर’ यांच्या प्रसिध्द ‘पवित्र मजला’ कवितेतील एक चरण आवर्जून नोंदवावा वाटतो तो असा –
पवित्र मजला साधा मानव प्राणी । श्रीरामाहून श्रीकृष्णाहून।
वास्तविक आपल्या देशाचे सर्वशक्तिमान संविधान आणि त्याचे कायद्यांचे रक्षणकर्ती सर्व न्यायालये ही सर्वत: देशाचे सर्व नागरिक आणि सर्व देवेतर घटकांसाठी आहेत. मनुवादी पाखंडी सनातनी वर्ण वर्चस्ववादी वृत्तीच्या कुकर्म्याच्या मते जर त्यांचे सर्व देव-देवता सर्वशक्तिमान, त्यांचे उध्दार कर्ते आहेत. तर त्यांच्यासाठी त्यांनी त्यांच्याकडेच (देवाकडे) जावे. मानवी न्यायालयात त्यांनी येऊच नये. असे जर याबाबत सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीश गवई साहेब जे बोलले तर ते आजिबात गैर नाही असे मला वाटते. खरेतर मा. गवई साहेब हे संविधान आणि तदर्थ कायद्याचे रक्षणकर्तेच आहेत. ते संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेबांचे खरेखुरे वारसदार आहेत. त्यांचा मला अभिमान आहे.
मा. सरन्यायाधीश भुषण गवई साहेबांनी खरोखरच महात्मा तथागत गोतम बुध्दांचा ‘धम्मविचार’ अत्त-दीप-भव म्हणजे सर्व दु:ख हरण्यासाठी ‘स्व-स्वयंप्रकाशित’ राहण्याचा मूलमंत्र स्वीकारलाय. कायद्याने मानवांसाठी न्याय असतो तो कधीच निष्ठूर असत नाही. त्यात क्षमा हा मोठा सद्गुण वापरतात. चुकीचे वर्तन करणाऱ्या व्यक्तीत सुधारणा होऊन तो चांगला माणूस बनावा यासाठी क्षमा करणे हे एक महत्त्वाचे कर्तव्य ठरते. त्या नतद्रष्ट ब्राह्मण वकिलास कायदेशीर चांगलाच धडा शिकवणे मा. गवई साहेबांना सहज शक्य होते. परंतु महात्मा बुद्ध संस्कारित मा. गवई साहेबांनी क्षणाचाही विलंब न लावता बुध्ददर्शित करूणा दाखवली. त्याच्यावर कोणतीही अहितकारी कारवाई न करता दिलदारपणा सरन्यायाधीशांनी दाखवला आहे. ही त्यांच्या मनाची विलक्षण थोरवी आहे. तथागत गोतम बुध्दांचे- १७ व्या शतकातील खरेखुरे सधन वारसदार-जगद्गुरू तुकाराम महाराज आपल्या एका दयार्द्रभाव अभंगात उपदेशताना म्हणतात-
भले तरी देऊ कासेची लंगोटी । नाठाळाचे काठी हाणू माथा ।। या चरणातून संत तुकोबाराय सांगतात आम्ही गरजवंताना आमच्याकडे असलेले सर्व काही देऊ. असे आम्ही आमचे कर्तव्य त्याचे माथी रूजू करू. असा महान साधू संत विचार मानवतावादी मा. भुषण गवई साहेबांनी अनुसरला आहे असेच म्हणावेसे वाटते.
‘तुका म्हणे’ लोक जैसा ओक धरिता धरवेना । अभक्ता जिरेना संत संग ।। लोकांना आलेली ओकारी जशी दाबून (आवरून) धरता येत नाही. तसे चांगले वागूननही काही लोक नावेच ठेवतात. अशा सर्वांचे तोंडाला हात लावता येत नाही. आपण त्याकडे खुशाल दुर्लक्ष करावे. त्या नीच ब्राह्मण वकिलास मा. गवई साहेबांनी दयार्द्रवृत्तीने क्षमा केली हे काही जनांस नसेन आवडले. आम्हा काय त्याचे?
मा. भुषण गवई साहेबांचे या दयार्द्रवृत्तीचे समर्थनच करायला मला आवडेलच. माझे समर्थन आहे. सरन्यायाधीश भुषण गवई साहेबांना भावी सत्कार्यासाठआमच्या वतीने आरोग्यपूर्ण दीर्घायुष्य लाभो ही सदिच्छा!
अरविंद जगताप – सेवानिवृत्त, मुख्याध्यापक
मो. ९९२३६४३८३९
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत