दिन विशेषमहाराष्ट्रमुख्यपान

प्रियदर्शी चक्रवर्ती सम्राट अशोका विजयादशमी व ६७व्या धम्म चक्र प्रवर्तन दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा – दिन विशेष

‌         ‌
इसवी सन २०२३ – २४ ऑक्टोबर

धम्म चक्र प्रवर्तन दिन
दसरा विजयादशमी

संयुक्त राष्ट्र दिन
जागतिक विकास माहिती दिन
जागतिक पोलियो दिन

१८५१: विल्यम लसेल यांनी युरेनस  ग्रहाच्या अंब्रियाल व अरीयेल चंद्राचा शोध लावला
१८५७: शेफील्ड एफ.सी. हा जगातील सर्वात जुना फुटबॉल क्लब शेफील्ड, इंग्लँड येथे सुरु झाला.
१९०१: एनी एडसन टेलर नायगारा धबधब्यात बॅरल मधून उडी मारणारी पहिली व्यक्ती.
१९०९: स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी बॅ. गांधी यांच्या अध्यक्षतेखाली लंडनमध्ये प्रथमच दसर्‍याचा उत्सव साजरा केला.
१९३३: सर विन्स्टन चर्चिल साक्ष नोंदविण्यासाठी लंडन येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर समक्ष उपस्थित
१९४५: संयुक्त राष्ट्रांची (United Nations) स्थापना झाली
१९४९: युनायटेड नेशन्सच्या मुख्यालयाचे काम सुरु झाले.
१९५१: सकाळी ७ वाजता २४.१०.१९५१ या दिवशी डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध अँड हीज धम्म हा ग्रंथ लिहिण्याची सुरुवात केली
१९६३: देशात असलेल्या दुष्काळामुळे सार्वजनिक व मोठया समारंभात तांदळाच्या पदार्थावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली.
१९६४: उत्तर र्‍होडेशियाला (आफ्रिका) युनायटेड किंगडमपासुन स्वातंत्र्य मिळाले व त्याचे झांबिया असे नामकरण करण्यात आले.
१९८४: भारतामधे प्रथमच भुयारी रेल्वे कोलकाता येथे सुरू झाली.
१९९७: सतारवादक पंडित रविशंकर यांना संगीतक्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल जपानचा ’प्रिमियम इंपिरिअल आंतरराष्ट्रीय पुरस्कार’ प्रदान.
२००२: सलमान खान याचा पुन्हा जामीन मंजूर आणि सुटका.
२००३: कॉनकॉर्ड विमानाचे शेवटचे व्यावसायिक उड्डाण झाले.
२०१६: सायरस मिस्त्री यांची टाटा समूहाच्या चेअरमन पदावरून हकालपट्टी.

जन्मदिवस
१७७५: दिल्लीचा शेवटचा बादशहा बहादूरशहा जफर
१८६८: भवानराव श्रीनिवासराव तथा ’बाळासाहेब’ पंतप्रतिनिधी – औंध संस्थानचे अधिपती, चित्रकार, कीर्तनकार तसेच व्यायाम विषयक पुस्तकांचे कर्ते
१९१०: मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री लीला ऊर्फ माई भालजी पेंढारकर.
१९११: स्वातंत्र्यसैनिक व समाजवादी नेते, अशोक मेहता
१९१४: आझाद हिंद सेनेतील झाशी राणी रेजिमेंटच्या कॅप्टन लक्ष्मी सहगल
१९२१: व्यंगचित्रकार रासीपुरम कृष्णस्वामी तथा आर. के. लक्ष्मण, पद्मभूषण (१९७१), रॅमन मॅगसेसे (१९८४), पद्मविभूषण (२००५) इत्यादि पुरस्कारांचे मानकरी
१९२६: सिक्कीमचे राज्यपाल, दिल्लीचे महापौर केदारनाथ सहानी
१९३५: भारतीय पत्रकार आणि लेखक मार्क टुली.
१९६३: भारतीय अमेरिकन उद्योगपती अरविंद रघुनाथन

मृत्यूदिन
१९२२: कॅडबरी चे संस्थापक जॉर्ज कॅडबरी
१९४४: रेनॉल्ट कंपनी चे संस्थापक लुई रेनॉल्ट
१९९१: स्टार ट्रेक चे निर्माते जीन रोडडेबेरी
१९९१: ऊर्दू कथा व पटकथा लेखिका इस्मत चुगताई
१९९२: अरविंद गोखले – मराठी नवकथेचे जनक, ’गंधवार्ता’ या त्यांच्या कथेला आशियाई-अरबी-अफ्रिकी कथा स्पर्धेचे पहिले पारितोषिक मिळाले. भारतीय उपखंडातील प्रसिद्ध लेखकांच्या लघुकथांचा अभ्यास करण्यासाठी त्यांना १९८४ मधे केंद्र सरकारची फेलोशिप मिळाली होती.
१९९५: पत्रकार, भारतीय श्रमिक पत्रकार संघटनेचे अध्यक्ष माधवराव साने.
२०११: लिस्प प्रोग्रॅमिंग लँग्वेज चे जनक जॉन मॅककार्थी
२०१३: ख्यातनाम पार्श्वगायक प्रबोधचंद्र तथा मन्ना डे.  ’सीमा’, ’बरसात की रात’, ’दो बिघा जमीन’, देख कबीरा रोया’ आदी चित्रपटांतील त्यांची गाणी गाजली होती.
२०१७: पद्मश्री, पद्मभूषण व पद्मविभूषण पुरस्कार तसंच, संगीत नाटक अकादमी पुरस्कार सन्मानित  बनारस घराण्याच्या सुप्रसिद्ध भारतीय शास्त्रीय गायिका गिरीजा देवी.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!