डॉ. आंबेडकर वाणिज्य व अर्थशास्त्र महाविद्यालय, वडाळा, मुंबई येथे सावित्रीबाई फुले यांची १९५ वी जयंती उत्साहात साजरी

सावित्रीबाई फुले यांची १९५ वी जयंती उत्साहात साजरी
डॉ. आंबेडकर वाणिज्य व अर्थशास्त्र महाविद्यालय, वडाळा, मुंबई–३१ येथे दिनांक ३ जानेवारी २०२६ रोजी थोर समाजसुधारिका व भारतातील पहिल्या महिला शिक्षिका क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची १९५ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रो. डॉ. यशोधरा वराळे मॅडम विराजमान होत्या. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून चेतना महाविद्यालयाच्या डॉ. श्यामली सोनटक्के मॅडम उपस्थित होत्या. तसेच वरिष्ठ महाविद्यालयाच्या WDC सेलच्या प्रमुख डॉ. गंगोत्री निर्भवणे मॅडम, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. बी. एस. पाटील, तसेच प्रा. डॉ.संगीता मॅडम, प्रा. एस जी वाघ मॅडम प्रा. अलका वाघ मॅडम प्रा. टी. जी. कोकाटे सर, प्रा एम ए मिरज प्रा. संध्या चव्हाण मॅडम, प्रा. एस. एन. वाघ सर, प्रा. बी. के. महाजन सर, डॉ. डी. एस. हजारे सर व प्रा. एस. बी. जाधव सर आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात प्राचार्या डॉ. यशोधरा वराळे मॅडम यांच्या प्रेरणादायी भाषणाने झाली. त्यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्यावर सखोल प्रकाश टाकत स्त्री शिक्षण व सामाजिक परिवर्तनातील त्यांच्या योगदानाचे महत्त्व विशद केले. त्यानंतर प्रमुख पाहुण्या डॉ. श्यामली सोनटक्के मॅडम यांनी आपल्या भाषणातून सावित्रीबाई फुले यांच्या संघर्षमय जीवनाची माहिती देत त्यांच्या विचारांची आजच्या काळातील उपयुक्तता अधोरेखित केली.
कार्यक्रमाच्या शेवटी प्रा. टी. जी. कोकाटे सर यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली. प्राचार्यांच्या परवानगीने कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत



