नळदुर्ग शहरातील नगर परिषदचे स्वीकृत सदस्य म्हणून रिपब्लिकन पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष बाबासाहेब बनसोडे यांना संधी द्यावी

प्रभाग १० हाच ठरला भाजप विजयाचा खरा शिलेदार यामुळेच रिपाइंला संधी उपलब्ध करून द्यावी
नळदुर्ग
दादासाहेब बनसोडे
नुकत्याच झालेल्या नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ सन्माननीय नगराध्यक्ष तथा नगरसेवक आणि नगरसेविका या पदासाठी खूप मोठ्या प्रमाणात चुरशीची लढत नळदुर्ग शहरात पाहायला मिळाली पुर्वी पासुनच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया [ आठवले गट ] महायुतीचे गट बंधन झाले असून गेली अनेक वर्षापासून महायुतीमध्ये पक्ष एकनिष्ठ म्हणून कार्यरत गेल्या ४० वर्षापासून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे आठवले गट राष्ट्रीय अध्यक्ष तथा सामाजिक न्याय राज्यमंत्री भारत सरकार मा ना रामदासजी आठवले यांचे ते निकटवर्तीय आणि कट्टर समर्थक म्हणून बाबासाहेब दुष्यंत बनसोडे यांची खाती आहे त्यांचे वडील दुष्यंत चंद्राप्पा बनसोडे हे मुळचे राजकारणी आहेत हे घरांना दुष्यंत चंद्राप्पा बनसोडे हे रिपाइं च्या हत्ती चिन्हावर निवडणूक लढविली आणि १५ वर्ष नगरसेवक म्हणून काम पाहिले आहे त्यांचे पुत्र रिपाइं पक्षाची एकनिष्ठ राहात रिपाईचे जिल्हा उपाध्यक्ष बाबासाहेब दुष्यंत बनसोडे यांना नळदुर्ग येथील नगर परिषद मध्ये भाजपाच्या कोट्यातून स्वीकृत सदस्य म्हणून त्यांना संधी उपलब्ध करून देण्यात यावी आशा प्रकारची मागणी शहरांमध्ये जोर धरत आहे .
नळदुर्ग शहराच्या आजपर्यंतच्या इतिहासात प्रथमच भाजपाला सत्ता मिळवण्याची संधी मिळाली आहे ही संधी फक्त प्रभाग १० अनु सुचित जाती प्रवर्ग व मतदाराने आहे आणि प्रभाग १० मधल्या मतदारा मुळेच भाजप विजयाचा शिलेदार ठरला आहे यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चे जिल्हा उपाध्यक्ष बाबासाहेब बनसोडे यांना स्वीकृत सदस्य म्हणून नगर परिषद सभागृहात पाठवावे आशा प्रकारची मागणी जोर धरत आहे
चौकट
नळदुर्ग शहरातुन प्रभाग दहा मधुन भाजपा महायुतीला मतदाराचा कौल मिळाला म्हणून आज भाजपाचे नव निर्वाचित नगराध्यक्ष व नगरसेवक व नगरसेविका यांना भरघोस ” मत दान ” मिळाले आणि प्रभाग १० हाच ठरला खरा भाजपा विजयचा शिलेदार
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत



