आदरणीय डी. एस. सावंत सरांना जेजेटीयु मधून ‘पीएचडी इन लॉ’ ही डॉक्टरेट डिग्री प्रदान.
मुंबई : उच्चविद्याविभूषित आंबेडकरी विचारवंत, सेंट्रल रेल्वे इसी बँकेचे विद्यमान चीफ मॅनेजर, आंबेडकरी चळवळ गतिमान करण्यासाठी प्रामाणिक हेतूने दैनिक जागृत भारत तसेच दैनिक वृत्तरत्न सम्राट मध्ये क्रांतिकारी स्तंभलेखन करणारे निष्ठावान प्रतिभावान लेखक, आयुष्याच्या प्रत्येक वळणावर प्रखर संघर्षाला तोंड देत यश खेचून आणणारे लढाऊ तडफदार व्यक्तिमत्व, अनेक वैचारिक मार्मिक पुस्तकांचे लेखक आणि विचारधारेशी तत्वांशी कसलीही तडजोड न करता स्पष्टपणे मत मांडणारे परखड वक्ते, सर्वांना सोबत घेऊन मनमिळाऊपणे काम करणारे आदरणीय डी. एस. सावंत सर यांना जेजेटीयु मधून पीएचडी इन (लॉ) ही डिग्री प्रदान करण्यात आली.
ह्या डिग्री बरोबरच आता त्यांच्याकडे एम कॉम. मुंबई, एल.एल.एम. पुणे, एम.एम.एस. फायनान्स मुंबई, एम.फिल.(लॉ) मुंबई, तसेच पीएचडी (लॉ) आशा सात रेग्यूलर डिग्रीज आणि इतर डिप्लोमा अशा शैक्षणिक पदव्या आहेत.
विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या सिद्धार्थ महाविद्यालयातुन आणि पदस्पर्शाने पावन झालेल्या सिडनीहॅम महाविद्यालयातुन सावंत सरांनी पदव्या घेतलेल्या आहेत. आपल्या शैक्षणिक समृद्धतेचा स्वतःसाठी किंवा परिवारासाठी कमी पण समाजासाठी जास्तीत जास्त लाभ व्हावा या निस्वार्थी भावनेने सावंत सर नेहमी कृतीशील कार्यक्रमात सक्रिय असतात. दैनिक जागृत भारत हा या उद्देशाचाच एक भाग असून महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यातून बुद्धिजीवी मंडळींचा उत्तम प्रतिसाद आयु. डी.एस.सावंत सरांना अर्थात दैनिक जागृत भारत टीमला मिळत आहे.
नोकरी, परिवार सांभाळत पीएचडीतील या यशा सोबत सावंत सरांनी गाठलेल्या उत्तुंग शैक्षणिक भरारीचे समाजातील विविध स्तरातुन कौतुक होत आहे. साहित्य, वृत्तपत्र, आंबेडकरी चळवळीतील विविध पक्ष, संघटना, मित्र मंडळी नातेवाईक व परिवारातुन त्यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव होत आहे.
या यशाबद्दल तसेच भावी आयुष्यासाठी भारतीय बौद्ध महासभा जिल्हा धाराशिव, आनंद बुध्द विहार हडको तुळजापूर, धम्म रत्न देविदास राव कदम सोशल फाउंडेशन तुळजापूर, तसेच दैनिक जागृत भारत-टीम धाराशिव व मित्र परिवाराच्या वतीने आपले हार्दिक अभिनंदन व आपल्या कार्यास क्रांतिकारी जयभीम.
देविदास विक्रांत कदम, तुळजापूर जी. धाराशिव
मो. 9890 542410.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत