“खैरात…जाहिरातींची.!”

उत आलाय जाहिरातींना,
सगळीकडे घरादारात, गल्लीबोळात, आणि उजाड माळात.!
पळा, पळा, पुढे कोण पळे,
चुरस लागलीय, गिर्हाईक गटकवण्यात, माल खपवण्यात.!
कधी काळी गरज,
भासता कर्जाची,
पूर्तता लागे, खूप कागदपत्रांची,
येरझार्यांनी, दमछाक होई जीवाची,
नसे पर्वा कुणालाच, ग्राहकाची,
वेळ येई, “भीक नको पण कुत्रं आवर” म्हणण्याची.!
आता मात्र घड्याळाचे काटे,
फिरताहेत उलट्या वाटे,
खैरात प्रलोभनांची करीत,
घ्या कर्ज, कर्ज घ्या, विना तारणावर,
जाहिरातींच्या लाटा , आदळताहेत,
नित्य नेमाने कानांवर.!
संबोधून बळीच्या बकर्याला,
“ग्राहक राजा”,
आकर्षिती चौफेर, करीत गाजावाजा,
सांगती , फक्त रोख रक्कम मोजा,
येई तत्पर सेवा, उंबरठा, दरवाजा.!
एव्हढेच काय, नसेल खिशात दमडी
साधी,
प्रोत्साहित करीती, बॅग भरा, अन नका चुकवू पर्यटनाची संधी,
आनंद, मौजमजा अल्पकालीन ठरते,
कर्जफेडीने जीव तडफडत,
पुढील काही महिने, झोप उडते.!
पुढील काही महिने, झोप उडते.!!
पुढील काही महिने, झोप उडते.!!!
अरुण निकम,
9323249487.
मुंबई,
दिनांक…07/01/2026.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत



