
“१ जानेवारी१८१८ रोजी भिमा कोरेगांव येथील युद्धात ५००महार सैनिकांनी इंग्रजांना साथ देऊन जुल्मी, अन्यायी पेशवाई संपुष्टात आणली. महारांनी परकीय इंग्रजांना साथ दिली, म्हणून पेशवाई संपली, आणि या देशावर इंग्रजांचे राज्य आले, असा महार समाजावर आरोप करुन, त्यांना मनुवादी पिलावळ गद्दार तर म्हणतेच, परंतु इंग्रजांशी सलोख्याचे संबंध असल्याने, महात्मा फुले यांना याच हरामी पिलावळीने ‘बाटगा’ तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना ‘इंग्रजांचा हस्तक’ म्हणायलाही कमी केले नाही….
असो…आता यांचा इतिहास बघूयात –
आपापसातील वादामुळे पोरसला धडा शिकवण्याकरीता, ज्या आंभी ने झेलम ओलांडून सिकंदराला भेटून त्यास भारतावर आक्रमण करावयास निमंत्रण धाडले, तो आंभी कोण….? देशभक्त….?
महान बौद्ध सम्राट अशोक यांचा वंशज मौर्य सम्राट बृहद्रथ याची कपटाने हत्या करुन, मौर्य साम्राज्य बळकवणारा त्याचाच ब्राह्मण सेनापती पुष्यमित्र शृंग हा कोण….? देशभक्त….?
सिंधचा शेवटचा सम्राट दाहीर याचा बौद्ध धर्माकडे वाढत चाललेला कल पाहून, हा एक दिवस बौद्ध धर्म नक्कीच स्विकारीन, या भितीने, अरब आक्रमक मोहंमद-बिन कासिम यास सिंधवर आक्रमण करण्याचे निमंत्रण देणारे देवलाबाद येथील ब्राह्मण पुरोहित कोण….? देशभक्त…..?
भरभराटीस आलेल्या नालंदा विद्यापीठाची वाढती ख्याती सहन न होऊन, मुस्लिम आक्रमक बख्तियार खिल्जी यास दुरुनच नालंदा विद्यापीठाच्या भव्य तटबंदीला किल्ल्याची तटबंदी भासवून, तेथे अमर्याद असा पुरातन खजिना, सोने-चांदी, हिरे-माणके, हजारो सुंदर स्त्रिया असल्याची खोटी माहिती देऊन, जगद्विख्यात नालंदा बौद्ध विश्वविद्यालय कपटाने जाळून उध्वस्त करावयास लावणारा सोमदत्त हा ब्राह्मण कोण….? देशभक्त….?
दिल्लीवर शासन करणारा शेवटचा हिंदू शासक पृथ्वीराज चौहान, याच्या द्वेषापायी त्यास संपविण्याकरीता अफगाण आक्रमक मोहंमद घोरीस निमंत्रण देऊन, त्याच्या करवी कपटाने पृथ्वीराज चौहान याचा खून करविणारा त्याचाच जातभाई जयचंद राठोड हा कोण….? देशभक्त…?
ब्राह्मणांना गरजेपेक्षा अधिक दान देतो, म्हणून यादव सम्राट रामचंद्रदेव यादव याने खडी कानउघडणी केल्यामुळे दुखावलेला देवगिरीच्या यादवांचा दानाध्यक्ष हेमाडपंत याने देवगिरीचे यादवसाम्राज्यच नष्ट करण्यासाठी अल्लाउद्दीन खिल्जी यास निमंत्रित केले. हा हेमाडपंत कोण….? देशभक्त….?
आपल्या स्वार्थापोटी आपल्याच बहिणी आणि मुली मोगल बादशहा अकबर, जहांगीर, शहाजहान, औरंगजेब यांना देणारे रजपूत राजे मानसिंह, रावजोधा, भारमल, जसवंतसिंह राठोड हे कोण…..? देशभक्त…..?
दक्षिणेतील बलाढ्य अशा काकतीय वंशाचे वरंगळ येथील साम्राज्य संपुष्टात आणण्यासाठी स्वतः मुसलमान झालेल्या गंगू ब्राह्मणाने काकतीय साम्राज्य नष्ट करुन, स्वतः ची बहमनी( ब्राह्मणी ) सल्तनत स्थापन केली, तो गंगू ब्राह्मण ( हसन गंगू) हा कोण….? देशभक्त…..?
त्याच्याच बहमनी सल्तनतीची शकले करुन पुढे त्याच्याच कपटी सुभेदारांनी आपापल्या नावाने स्वतंत्र पाच पातशाह्या स्थापन केल्या. १) बिदरची ‘बरिदशाही’ २)गोवळकोंड्याची ‘कुतुबशाही’ ३) विजापूरची ‘आदिलशाही’ ४) अहमदनगरची ‘निजामशाही’ व ५) वऱ्हाडची ‘ईमदशाही’
त्यापैकी ३ शाह्यांचे संस्थापक हे मुळचे ब्राह्मण असून, आपल्या स्वार्थासाठी त्यांनी मुसलमानी धर्माचा स्विकार केला होता. ते ब्राह्मण कोण….? देशभक्त….?
अहमदनगरच्या ‘निजामशाही’ चा संस्थापक भैरवपंत वल्द तमाभट हा मुळचा परभणी जिल्ह्यातील पाथरी येथील कुलकर्णी. तो धर्म बदलून मुसलमान होऊन चक्क ‘अहमद निजामशहा’ बनला. मग तो कोण….? देशभक्त….?
आपल्या यादव घराण्याचा यथार्थ अभिमान बाजूला सारून फक्त सिंदखेडराजा येथील जहागिरीसाठी अहमदनगरच्या मुसलमानी निजामशाहीची इमानेइतबारे चाकरी करणारे , स्वराज्य-जननी जिजाऊ माँसाहेब यांचे वडिल -मराठा सरदार लखोजीराव जाधव आणि त्यांची पाच मुले, म्हणजेच जिजाऊंचे बंधू, हे कोण….? देशभक्त…..?
पुणे, सुपे, चाकण, इंदापूर, बेंगलोर, तंजावर येथील आपल्या जहागिऱ्या वाचवण्यासाठी कधी ‘आदिलशाही’ तर कधी ‘निजामशाही’ , या मुसलमानी ‘शाह्यां’ना साथ देणारे, स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे वडील – मराठा सरदार शहाजीराजे व त्यांचे बंधू शरीफजीराजे भोसले हे कोण….? देशभक्त….?
सुरुवातीपासून शेवटपर्यंत अहमदनगरच्या निजामशहाशी एकनिष्ठ राहून वेरुळ येथील पाटीलकी पिढ्यानपिढ्या उपभोगणारे शहाजी राजांचे वडील मालोजीराजे, चुलते विठोजीराजे व आजोबा बाबाजीराजे भोसले हे कोण….? देशभक्त….?
जहागिरीच्या लालसेपोटी स्वराज्यातून फुटून चक्क मुसलमान होऊन औरंगजेबाला साथ देणारे छत्रपती शिवाजी महाराज यांचेच शूर सरदार बजाजी नाईक निंबाळकर व नेताजी पालकर (मुहम्मद कुलीखान) हे मराठा सरदार कोण….? देशभक्त….?
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्य स्थापनेस विरोध करुन, त्यांच्यावरच हत्यार उपसणारे जावळीचे चंद्रराव मोरे हे आदिलशहाचे मराठा सरदार कोण…..? देशभक्त…..?
‘रामदास स्वामी’ हा आदिलशाही दरबारातील हेर छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य संपुष्टात आणण्यासाठी अनेक प्रकारची ना-ना षडयंत्रे रचत होता. तो कोण…..? देशभक्त….?
छत्रपती शिवाजी महाराजांवर पहिला वार करणारा , आदिलशाही दरबारी सेवक व अफजलखानाचा ‘वकील’ असणारा कृष्णाजी भास्कर कुलकर्णी कोण…..? देशभक्त….?
इनाम व जहागिरीच्या लालसेने मराठ्यांचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांना कपटाने पकडून औरंगजेबाचे हवाली करणारे त्यांचे सख्खे मेव्हणे मराठा सरदार गणोजी शिर्के हे कोण….? देशभक्त….?
स्वराज्याची राजधानी रायगडाचे चोरदरवाजे औरंगजेबाचा सरदार झुल्फिकारखान यास कपटाने खुले करुन, स्वराज्याच्या महाराणी येसूबाई यांनी मोठ्या विश्वासाने सोपविलेल्या स्वराज्याच्या खजिन्याच्या चाव्या त्यास बहाल करणारा सूर्याजी पिसाळ हा मराठा सरदार कोण…..? देशभक्त…..?
शनिवार वाड्यावरील भगवा जरीपटका उतरवून, त्यावर स्वहस्ते इंग्रजांचा ‘युनियन जॅक’ फडकावणारा आणि शनिवार वाड्याच्या किल्ल्या इंग्रजांना देणारा ‘बाळाजीपंत नातू’ हा ब्राह्मण कोण…..? देशभक्त…..?
आद्य क्रांतिकारक उमाजी नाईक यांची गोपनीय बातमी कॅप्टन मॅकिन्टॉश यास पुरविणारा पुरंदरचा ब्राह्मण पुरोहित कोण…..? देशभक्त…..?
स्वातंत्र्य चळवळीत अनेक क्रातिकारकांचे गुप्त अड्डे व त्यांच्या कारवाया यांची वरचे वर माहिती इंग्रजांना देऊन स्वातंत्र्य चळवळ हाणून पाडणारे तथाकथित स्वातंत्र्य प्रेमी कोण….? देशभक्त…..?
काळ्यापाण्याच्या शिक्षेतून सुटका व्हावी, आणि पुन्हा आयुष्यभरात कधीही इंग्रजांच्या विरोधात बोलणार नाही, आणि स्वातंत्र्य आंदोलनातही सहभाग घेणार नाही, यासाठी इंग्रजांचे उंबरठे झिजवून, त्यांना सहासहा माफीनामे लिहून देणारा, व त्याबदल्यात १९२७ ते १९४७ अशी देश स्वतंत्र होईपर्यंत तब्बल २० वर्षे ६०रुपये दरमहा इंग्रजांकडूनच पेन्शन घेणारा आणि ‘सहा घानेरी पाने’लिहिणारा, ब्रायटनच्या समुद्रात कमरेएवढ्या पाण्या उडी मारलेला, अंदमानचा बौद्धद्वेष्टा ‘माफीवीर’ कोण….? देशभक्त…..?
” तेली, तांबोळी आणि कुणबटांनी संसदेत जाऊन काय नांगर हाकायचा ?”, असे बोलणारा आणि इंग्रजांच्या सोबत काँग्रेस ची स्थापना करणारा टिळक कोण…..?देशभक्त…..?
आम्हांला 'गद्दार ' म्हणणाऱ्यांनो, तुम्ही तुमच्या 'गद्दारी'चा इतिहास एकदा नक्की तपासून बघावा.....
------- अशोक नगरे-----संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत



