महाराष्ट्रमुख्यपानसामाजिक / सांस्कृतिक

आनंद बुद्ध विहार हडको तुळजापूर येथे अशोक विजयादशमी निमित्त जाहीर धम्म दीक्षा व “घरोघरी संविधान उद्देशीका” अभियानास सुरुवात..

भारतीय बौद्ध महासभा जिल्हा अध्यक्षा आदरणीय विजयमालाताई धावारे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या विशेष कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ कार्यकर्ते प्राध्या. डी डी मस्के सर व टाटा सामाजिक विज्ञान संस्था तुळजापूर येथील आयुष्मान रमेश जारे सर व शकुंतलाताई जारे यांची विशेष उपस्थिती होती.

भारतीय बौद्ध महासभा या मातृसंस्थेच्या माध्यमातून बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या 22 प्रतिज्ञांचे पठण करून सर्वांना जाहीर धम्मदीक्षा देण्यात आली. या मंगल दिनी हंगरगा (तुळ) येथील आयुष्मान वैभव रवी शिरसाट आणि त्यांच्या सुविद्य पत्नी प्रज्ञाताई तसेच आयुष्मान अनिल विठ्ठल सरतापे आणि त्यांच्या सुविद्य पत्नी रोहिणीताई या दोन कुटुंबांनी आपल्या मुलांसह बौद्ध धम्मदीक्षा ग्रहण केली आणि धर्मांतरित झाले.

या प्रसंगी जारे परिवाराच्या वतीने संविधानाच्या उद्देशिकेची सहा फुटाची मोठी प्रत रवींद्रदादा कदम सार्वजनिक वाचनालयास भेट देण्यात आली. तसेच घराघरात संविधान असावे व उद्देशिकेचे स्मरण राहावे या उद्देशाने उपस्थित मान्यवरांना, सत्कार मूर्तींना व गुणवान विद्यार्थ्यांना संविधानाच्या फोटोफ्रेम चे वाटप व उड्डेशिकेचे वाचन करण्यात आले.

हडको तुळजापूर येथील आयु. बाबासाहेब रविंद्र कदम यांना औरंगाबाद येथे दलीत पँथर सुवर्ण महोत्सव संयोजन समिती – 2023 च्या वतीने नामांतर लढ्यातील त्यांच्या त्याग समर्पणाला अभिवादन म्हणून “पॅंथर गौरव पुरस्कार” देऊन सन्मानित करण्यात आले आहे, तसेच आयु. ईयासताई अफसर शेख यांची दिंडेगाव-टेलरनगर या एकत्रित ग्रामपंचायतीमध्ये सरपंच या प्रतिष्ठित पदावर निवड झाली आहे. समाजाच्या वतीने या दोन्ही परिवारांचा पंचशील पताका, संविधान उद्देशिका व पुष्पगुच्छ देऊन सविनय सत्कार करण्यात आला.

विहारात दररोज येणाऱ्या आकाश कदम, हर्ष चौधरी, संभव पगारे व यश बनसोडे या मुलांनी सुंदर अशा भाषणातून अशोक विजयादशमी चे महत्व सांगितले तर शिवानी शैलेश कदम आणि खुषी संतोष कदम यांनी सुंदर असे गीत गाऊन उपस्थितांची मने जिंकली. या सर्वांना संविधान उद्देशिकेची प्रत देऊन प्रोत्साहित करण्यात आले.

आपल्या मुद्देसूद भाषणात प्राध्या. डीडी मस्के सर यांनी संविधानाच्या उद्देशिकेवरती सहज सोप्या शब्दात मार्गदर्शन केले समता स्वातंत्र्य न्याय बंधुता या चार सूत्रांनी एकवटलेली आपल्या संविधानाची उद्देशिका ही सर्वांच्या घराघरात व मनामनात असली पाहिजे जेणेकरून विचारांमध्ये आणि कर्तुत्वामध्ये कायम आपल्याला याची जाण राहील. स्वातंत्र्याची सुरुवात किंवा स्वातंत्र्याची सवय आपल्या घरातूनच अगदी बालपणापासूनच करुया. मुला मुलींना शिक्षणाचे, करिअर क्षेत्र निवडण्याचे स्वातंत्र्य देऊन सर्वांनी एकमेकांच्या मताचा आदर करुया कारण इथूनच खऱ्या लोकशाहीची सुरुवात होते. राष्ट्रपिता ज्योतिबा फुले च्या आडनावातच F=Fraternity, U=Unity, L=Liberty, आणि E=Equality आहे हे सखोल अभ्यास पूर्ण निरीक्षण याप्रसंगी नोंदविले.

अध्यक्षीय भाषणात आयु. विजयमालाताई धावारे यांनी धम्म दीक्षित झालेल्या शिरसाठ व सरतापे परिवाराचे अभिनंदन केले व सर्वांना अशोक विजया दशमी च्या मंगल कामना व्यक्त केल्या. बाबासाहेबांनी म्हणल्याप्रमाणे मी प्रथमतः आणि शेवटी ही भारतीय आहे आणि हा भारत बौद्धमय केल्याशिवाय राहणार नाही या जाणिवेतून आपण सर्वांनी धम्माचा प्रचार प्रसार करण्यासाठी आपापले योगदान द्यावं अशी उपस्थितांना विनंती केली.

तुळजापूर येथील धम्मवंदना ग्रुप च्या वतीने आयु. काजल विजय चौधरी व शोभाताई चौधरी यांनी उपस्थितांना स्वादिष्ट खीर वाटप केली.

कार्यक्रमात आभार प्रदर्शन भारतीय बौद्ध महासभा जिल्हा पर्यटन सचिव आयु. दत्ता सुखदेव माने यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धम्मरत्न देविदासराव कदम सोशल फाउंडेशन तुळजापूर चे संस्थापक अध्यक्ष आयु. देविदास विक्रांत कदम यांनी केले.

कार्यक्रमाला वंचित बहुजन आघाडीचे आयुष्यमान मिलिंद रोकडे, दिशा समाज विकास संस्थेचे बाबासाहेब वडवे सर, कृषी उत्पन्न बाजार समिती चे संचालक आयु. एडवोकेट रामचंद्र ढवळे सर, आयु. धाकतोडे सर, मुख्याध्यापक आयु. करडखेले सर, डॉक्टर आदिती डॉक्टर सुरभी करडखेले, आयु. सुनील लोंढे सर, प्राध्या. आर. पी. गायकवाड सर, संजय चौधरी, कीर्ती संजय गायकवाड, स्वाती विलास सोनवणे, सत्यशीला कदम, चतुराताई कदम, सुमनताई रोकडे, उषा माने, उमाताई ढेपे यांच्यासह भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा तालुका ग्राम शाखेचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, समता सैनिक दल तसेच तुळजापूर तालुक्यातील प्रतिष्ठित समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

2 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!