दिनविशेष – गुरुवार दिनांक 23 मे 2024

आज दि. २३ मे २०२४, बुद्धाब्द २५६८, अशोकाब्द २३२८, भीमाब्द १३४, गुरूवारो, वेसाख मासो, गुरूवार, वैशाख माहे.
२३ मे १९३० – रोजी पुणे जिल्हा बहिष्कृत परिषदेचे मुक्काम नारायणराव, ता. जुन्नर येथे अधिवेशन.
२३ मे १९३२ – रोजी कोल्हापूर येथे कर्नाटकातील दिवाण बहादुर अण्णा आबाजी लठ्ठे यांच्या अध्यक्षतेखाली विश्वरत्न, बोधिसत्त्व, प. पू. भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मानपत्र व सत्कार.
२३ मे १९३३ – रोजी विश्वरत्न, बोधिसत्त्व, प. पू. भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर गंगा आगबोटिने मुंबईत परतले.
२३ मे १९४२ – रोजी “अस्पृश्यांना (बहुजनांना) स्वतंत्र मतदार संघ का पाहिजे.” या विषयावर कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांचे नाशिक येथे व्याख्यान.
२३ मे १९४९ – रोजी विश्वरत्न, बोधिसत्त्व, प. पू. भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान सभा चर्चेत आर्टिकल १००, १०१, १०२, १०३ यावर चर्चा केली.
२३ मे १९५३ – रोजी सामुदायिक प्रार्थना कशी करावी? याचे मार्गदर्शन विश्वरत्न, बोधिसत्त्व, प. पू. भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर करणार असल्या बाबतचे जनता वृत्तपत्रात बौद्ध धंम्म प्रचार समितीचे सेक्रेटरी श्री. आर. डी. भंडारे यांनी जाहीर केले.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत