आज सकाळी ७ वाजल्यापासून तेलंगणमधल्या ११९ विधानसभा जागांसाठी मतदानाला सुरुवात झाली असून संध्याकाळी ५ वाजता ते संपेल. तर राज्याच्या नक्षलग्रस्त भागातल्या १३ मतदारसंघांमध्ये मतदानाची वेळ ४ वाजेपर्यंतच असेल. या निवडणुकीत नऊशे अपक्षांसह शंभरहून अधिक पक्षांचे दोन हजारांहून अधिक उमेदवार रिंगणात असून त्यामध्ये २२१ महिला आणि एका तृतीयपंथीचा समावेश आहे. संपूर्ण राज्यात ३ कोटी २६ लाखांहून अधिक मतदार असून त्यांच्यासाठी एकंदर ३५ हजार ६५५ केंद्रांवर मतदानाची व्यवस्था करण्यात आली आहे. मतदान प्रक्रिया शांततेत पार पडावी यासाठी सर्व व्यवस्था करण्यात आली आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत