आदिवासी विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षेचे शिक्षण देणारी संस्था स्थापन करण्यात येणार.
आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित हे काल नाशिकमध्ये आदिवासी विकास विभागाच्या वतीने आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यात बोलत होते. स्पर्धा परीक्षांच्या युगात आदिवासी मुलेही गुणवत्तेने पुढे यावीत, यासाठी इयत्ता सहावीपासूनच आदिवासी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचे शिक्षण देणारी संस्था स्थापन करण्यात येईल अशी घोषणा यावेळी त्यांनी केली. आदिवासींच्या विकासासाठी कार्य करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांना गौरवण्यात आलं. आगामी काळात आदिवासी विद्यार्थ्यांसाठी आभासी वर्ग, डिजिटल ग्रंथालयं सुरू केली जाणार असल्याचं गावीत यांनी सांगितलं.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत