माजी महापौर दत्ता दळवींच्या गाडीची तोडफोड, गुन्हा दाखल.
माजी महापौर दत्ता दळवी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर, दत्ता दळवी यांना अटक झाली. त्यानंतर चार तरुणांनी येऊन दत्ता दळवी यांच्या गाडीच्या काचा फोडल्या आहेत.
भांडुपमध्ये रविवारी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा कोकण पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात भाषण करताना दत्ता दळवी यांनी शिंदे यांच्यावर असंसदिय शब्दात टीका केली होती असा आरोप आहे. मला वाटतं आज कदाचित दिघे साहेब असते ना, तर मी सांगतो या एकनाथ शिंदेला चाबकाने फोडून काढलं असतं. आम्ही सगळं बघितलेलं आहे. यासह अनेक अशी वाक्ये दळवींनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबतीत बोलली आहेत. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.
दगडाने आणि लाकडाने दळवी यांच्या गाडीवर हल्ला करून काचा फोडण्यात आल्या. या घटनेचा व्हिडिओ आणि सीसीटीव्हीही समोर आला आहे. माजी महापौर दत्ता दळवी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात वादग्रस्त विधान केलं होतं. या प्रकरणी आज सकाळी आठ वाजताच्या सुमारास भांडुप पोलिसांनी त्यांना विक्रोळी येथील राहत्या घरातून अटक केली होती. तक्रारदार भूषण | पलांडे या व्यक्तीने, दत्ता दळवी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आक्षेपार्ह विधान केल्याने भांडुप पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. या प्रकरणी भांडुप पोलिसांनी भारतीय दंड संविधान कलम १५३(A), १५३ (B), १५३(A) (१)सी, २९४, ५०४,५०५ (१) (C) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत