ट्रकच्या भीषण अपघातात 13 जण ठार; मृतांत मुलांसह आठ पुरुष, चार महिलांचा समावेश.

काल सकाळी सात वाजण्याच्या सुमारास चिक्कबळ्ळापूर ग्रामीण पोलिस स्टेशनअंतर्गत चित्रावतीजवळ येत असताना रस्त्याच्या कडेला सिमेंट घेऊन जाणारा ट्रक उभा होता. ट्रकला वाहनाने मागून जोराची धडक दिली आणि भीषण अपघात घडला. स्थानिक नागरिकांनी वाहनाच्या मागील दरवाजे काढून अपघातग्रस्तांना बाहेर काढण्यास सुरुवात केली. गंभीर जखमींना रुग्णालयात नेत असताना वाटेतच सातजणांचा मृत्यू झाला.
राष्ट्रीय महामार्ग ४४ वर काल, गुरुवारी सकाळी ही दुर्घटना घडली. या अपघातात आठ पुरुष, चार महिला आणि मुलाचा मृत्यू झाला आहे. अरुणा (वय ४०, रा. दोड्डबळ्ळापूर), त्यांचा मुलगा ऋत्विक यतीन (६ वर्षे), सुब्बम्मा (रा. बसवेश्वरनगर, बंगळूर), पेरुमल, कोट्टाचेरम, नरसिंहमूर्ती, कवल बैरसंद्र आणि चालक नरसिमप्पा अशी अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे आहेत.
उर्वरितांची ओळख पटविण्याचा पोलिस प्रयत्न करत आहेत. आयुधपूजेच्या निमित्ताने आपापल्या गावी गेलेल्या मजुरांनी कुटुंबियांसमवेत आनंदाने उत्सव साजरा केला. रात्री बंगळूरला परतण्यासाठी आंध्रप्रदेशातून आलेल्या वाहनामध्ये ते सर्व चढले. वाहन चालकाने ठिकठिकाणी उभे असलेल्या एकूण १३ जणांना घेऊन बागेपल्ली-चिक्कबळ्ळापूरमार्गे बंगळूरकडे वेगाने येत होता.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत