मालोजीराजेंची ‘वेस्टर्न इंडिया फुटबॉल’च्या उपाध्यक्षपदी पाचव्यांदा निवड.

मालोजीराजे छत्रपती यांची वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनच्या उपाध्यक्षपदी पाचव्यांदा बिनविरोध निवड झाली. ते कोल्हापूर स्पोर्टस् असोसिएशनचे अध्यक्ष असून, ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशनच्या कार्यकारी समितीचे सदस्य आहेत.
मालोजीराजे उत्कृष्ट फुटबॉलपटू असून कोल्हापूरच्या फुटबॉल विश्वाला राष्ट्रीय स्तरावर ओळख मिळावी, यासाठी प्रयत्नशील आहेत. शहरातील स्थानिक संघांना त्यांचे मोठे पाठबळ आहे. त्यांच्या प्रयत्नामुळे राष्ट्रीय स्तरावरील द्वितीय श्रेणीची फुटबॉल स्पर्धा छत्रपती शाहू स्टेडियमवर झाली.
संतोष ट्रॉफीचे सामने कोल्हापुरात आयोजन करण्यातही त्यांचा पुढाकार होता. त्यांच्या कार्याची दखल घेऊन यंदा पुन्हा ‘विफा’च्या उपाध्यक्षपदी निवड झाली आहे. त्यानंतर त्यांच्या अभिनंदनाचे फलक झळकले.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत