मतदानावर बहिष्कार, लोकप्रतिनिधींना गावबंदी; मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटला.

मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत पाडळी खुर्द (ता.करवीर) येथील ग्रामपंचायत, सकल मराठा समाज व सर्व ग्रामस्थांच्या वतीने आरक्षणासाठी लोकप्रतिनिधींना गावबंदी करण्याचा निर्णय घेतला. तसेच सर्व निवडणुकांतील मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत आज फलक लावून या ठिकाणी घोषणा देण्यात आल्या.
यावेळी सरपंच तानाजी पालकर म्हणाले,‘ मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने आम्ही आंदोलन पुकारले आहे.’ सुरेश पाटील म्हणाले, ‘ग्रामपंचायत व सर्व समाजाच्या वतीने, सर्व तरुण मंडळे, सर्व संस्था,सकल मराठा समाज यांच्यावतीने जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत आज गावामध्ये लोकप्रतिनिधींना गावबंदी करण्याचा निर्णय झाला.’
यावेळी तानाजी पाटील, दीपक पाटील ,विष्णुपंत पाटील, रोहन पालकर, अमित पाटील, विशाल सोनार, सुरज पाटील, ऋतुराज पाटील, मदन पाटील, विजय ढेंगे, तानाजी भाऊ पाटील ,संदीप पाटील, संग्राम भापकर, वसंत तोडकर उपस्थित होते.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत