देशमहाराष्ट्रमुख्यपानविचारपीठ

संस्कृत भाषा सर्वात प्राचीन नसून पाली प्राकृत ही भाषा सर्वात प्राचीन आहे

संस्कृत भाषा सर्वात प्राचीन नसून पाली प्राकृत ही भाषा सर्वात प्राचीन आहे आणि शुगन राजे(पुष्यमित्र शुंग) हा बुद्धीच राजा होता याचा प्रमाणित पुरावा खाली दिलेला आहे.

संस्कृत भाषा ही सर्वात प्राचीन भाषा आहे असा आजपर्यंत भ्रमवाद्यांनी जनमानसामध्ये भ्रम पसरून ठेवलेला आहे. खाली जी मी फोटोकॉपी दिलेली आहे ती ईसा पूर्व 200 वर्षा अगोदरचा अभिलेख आहे. हा अभिलेख गागी पुतस्य (गार्गी पुत्र) शुगन राजे या बुद्धिस्ट राजाने लिहिलेला आहे. याच बुद्धिस्ट राजाला भ्रम वाद्यांनी पुष्यमित्र शृंग असे दाखवून त्याला ब्राह्मण म्हणून घोषित केलेले आहे.

जर हा राजा ब्राम्हण असता तर त्याने संस्कृत भाषेमध्ये लिखाण केले असते परंतु हा अभिलेख जर वाचला तर तो संस्कृत मध्ये नसून त्याची भाषा पाली प्राकृत आहे. तो जर ब्राह्मण असता तर त्याने राम ,कृष्ण, शंकर, हनुमान, काली दुर्गा याचे मंदिरे बांधलेली असती, परंतु त्याने तसे न करता बुद्धिस्ट स्तूप याचे तोरण द्वार बांधले. साची च्या स्तूपाचे सुद्धा तोरण बांधले.

या अशा बुद्धिस्ट राजाला भ्रमवाद्यांनी इतिहासामध्ये ब्राह्मण म्हटलेले आहे परंतु त्याच्या अभिलेखावरून त्याच्या भाषेवरून हे सिद्ध होते की तो बुद्धिष्ट राजा होता.

दुसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी की हा त्याचा अभिलेख ईसा पूर्व 200 वर्षा आधीच आहे. जे महाभाग असे म्हणत असतील की संस्कृत भाषा ही सर्वात प्राचीन आहे तर त्यांनी या अभिलेखाच्या अगोदरचा संस्कृत भाषेमधला त्यांचा त्यांचा अभिलेख किंवा पुरातत्विक विभागाचा पुरावा दाखवून द्यावा, हे माझे खुले आव्हान आहे.

याउलट पाली प्राकृत भाषेमधूनच पुढे संस्कृत भाषा उदयास आली असे दिसून येते सुरुवातीला या संस्कृत भाषेलाच बुद्धिस्ट हायब्रीड संस्कृत म्हटल्या जात होते. या बुद्धिस्ट हायब्रीड संस्कृत पासूनच पुढे क्लासिकल संस्कृत जन्मास आली. म्हणून संस्कृत भाषेवर पाली भाषेचा प्रभाव दिसून येतो, हे सिद्ध करणारा पुरावा खाली देत आहे.

अयोध्येमध्ये एक शिलालेख सापडलेला आहे त्याचे स्टोन इनस्क्रिप्शन खाली दिलेले आहे. हा अभिलेख इसवी सनाच्या पहिल्या शतकातील आहे. या अभिलेखाची भाषा तुम्ही काळजीपूर्वक बघा तिथे लिहिलेले आहे या भाषेवर म्हणजेच संस्कृत भाषेवर प्राकृत भाषेचा प्रभाव आहे(Sanskrit influenced by prakrit)असे स्पष्ट लिहिलेले आहे. फोटोकॉपी क्र. 3 पहा.

जर संस्कृत भाषा सर्वात प्राचीन असती तर या अभिलेखावर प्राकृत भाषेवर संस्कृत भाषेचा प्रभाव आहे (prakrit influenced by Sanskrit) असे लिहिले गेले असते.

सरकार जवळ संस्कृत भाषेचा लिखित पुरावा हा सन 1464 चा आहे तर बुद्धिस्टांच्या पाली प्राकृत भाषेचा लिखित पुरावा हा ईसा पूर्व 200 वर्षा अगोदरच आहे. यावरून स्पष्ट सिद्ध होते की पाली प्राकृत हीच उद्दिष्टांची भाषा सर्वात प्राचीन असून संस्कृत भाषा ही पाली भाषेमधूनच जन्मास आलेली आहे आणि तीही बुद्धिस्टांनीच निर्माण केलेली आहे. संस्कृत भाषेसोबत ब्राह्मणांचा कुठलाही संबंध नाही. संस्कृत भाषा ब्राह्मणांनी निर्माण केलेलीच नाही हे स्पष्ट आहे.

सनातनी बुद्धिस्ट गंगाधर नाखले
04/03/2025,7972722081

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!