महाबोधी मुक्ती आंदोलन: बौद्ध धर्मीयांचा धार्मिक स्वातंत्र्यासाठी संघर्ष

बिहारमधील बोधगया येथे स्थित महाबोधी महाविहार हे बौद्ध धर्मीयांसाठी अत्यंत पवित्र स्थळ आहे. येथेच भगवान गौतम बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली होती, त्यामुळे हे संपूर्ण बौद्ध जगतात सर्वात महत्त्वाचे श्रद्धास्थान आहे. मात्र, दुर्दैवाने या ठिकाणच्या व्यवस्थापनावर बौद्ध धर्मीयांना पूर्ण नियंत्रण नाही, हेच या आंदोलनाचे प्रमुख कारण आहे.
महाबोधी मंदिर व्यवस्थापन कायदा, 1949 – हिंदूंचे वर्चस्व
बिहार सरकारने 1949 मध्ये “महाबोधी मंदिर व्यवस्थापन कायदा 1949” लागू केला, ज्याद्वारे महाबोधी महाविहाराच्या देखरेखीचे आणि व्यवस्थापनाचे काम महाबोधी मंदिर व्यवस्थापन समिती (Bodh Gaya Temple Management Committee – BGTMC) कडे सोपवण्यात आले. या समितीत हिंदूंचे स्पष्ट वर्चस्व आहे.
समितीतील धर्मीयांचे प्रमाण:
एकूण सदस्यसंख्या – 9
हिंदू सदस्य + अध्यक्ष – 5 (बहुमत)
बौद्ध सदस्य – 4 (अल्पमत)
महाबोधी मंदिर व्यवस्थापन कायदा 1949, यानुसार महाबोधी विहाराच्या व्यवस्थापन समितीमध्ये 4 हिंदू (महंत/ ब्राह्मण) आणि 4 बौद्ध (भिक्खू) सभासद असावे. तसेच या समितीचा अध्यक्ष “हिंदू”च असावा असाही नियम आहे.
अध्यक्षपदी हिंदू कलेक्टर असण्याची अट:
या कायद्याच्या नियमानुसार, समितीचा अध्यक्ष हमीने हिंदूच असावा आणि तो जिल्हाधिकारी (District Magistrate) असावा. एखाद्या परिस्थितीत जर बोधगयेचा जिल्हाधिकारी हिंदू नसेल तर शेजारील जिल्ह्याच्या “हिंदू” जिल्हाधिकाऱ्याला समितीचे अध्यक्षपद दिले जाते.
याचा अर्थ बौद्ध धर्मीय (भिक्खू) महाबोधी महाविहाराचे अध्यक्ष होऊ शकत नाहीत.
बौद्ध धर्मीयांवर अन्याय – अन्य धर्मांच्या स्थळांसाठी वेगळे नियम?
एखाद्या धर्मीयांच्या धार्मिक स्थळावर त्याच धर्म बांधवांचा अधिकार असतो आणि असावा, ही गोष्ट सर्वश्रुत आहे.
- हिंदू मंदिराच्या व्यवस्थापन समितीत फक्त हिंदूच असतात.
- चर्चच्या व्यवस्थापन समितीत फक्त ख्रिश्चन व्यक्तीच असतात.
- गुरुद्वाऱ्याच्या व्यवस्थापन समितीत फक्त शीख लोकच असतात.
- मशिदीच्या व्यवस्थापन समितीत फक्त मुस्लिमच असतात.
मात्र, महाबोधी महाविहार बौद्ध धर्माचे असूनही तेथील व्यवस्थापन समितीत बौद्धांहून जास्त हिंदू सभासद आहेत! हा बौद्ध धर्मीयांवरील मोठा अन्याय आहे.
बौद्ध धर्मावर होणारे अतिक्रमण:
या व्यवस्थेमुळे महाबोधी महाविहारात हिंदू धर्माचे कर्मकांड आणि विधी कायदेशीरपणे केले जातात, जे बौद्ध धर्मात निषेधार्ह आहेत. बौद्ध स्थळावर बौद्ध धर्माचे आचरण व्हायला पाहिजे, पण येथे हिंदू धर्माचरण घडते.
बरेच हिंदू लोक महाबोधी मंदिराला “शिव मंदिर” म्हणून चुकीची ओळख देत आहेत, पण इतिहास पाहिला तर स्पष्ट होते की हे शिव मंदिर नसून, सम्राट अशोकाने बांधलेले भगवान बुद्धांचे महाविहार आहे.
महाबोधी मुक्ती आंदोलन – बौद्ध धर्मीयांची मागणी
12 फेब्रुवारी 2025 पासून बिहारमध्ये ‘महाबोधी मुक्ती आंदोलन’ सुरू आहे. या आंदोलनात बौद्ध भिक्खू आणि उपासक महाबोधी महाविहाराच्या संपूर्ण नियंत्रणासाठी उपोषणाला बसले आहेत. त्यांची स्थिती दिवसेंदिवस चिंताजनक होत चालली आहे, परंतु त्यांच्या मागण्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.
बौद्ध धर्मीयांच्या प्रमुख मागण्या:
- महाबोधी महाविहाराचे संपूर्ण नियंत्रण बौद्ध धर्मीयांकडे द्यावे.
- महाबोधी मंदिर व्यवस्थापन कायदा 1949 मध्ये सुधारणा करावी आणि व्यवस्थापन समितीत फक्त बौद्ध धर्मीय असावेत.
- समितीच्या अध्यक्षपदी हिंदू कलेक्टर असण्याची अट रद्द करून, बौद्ध धर्मीयांना अध्यक्ष होण्याचा अधिकार द्यावा.
- महाविहाराच्या धार्मिक आणि सांस्कृतिक बाबींमध्ये कोणत्याही बाह्य धर्मीयांचा हस्तक्षेप थांबवावा.
बौद्ध धर्मीयांसाठी एक महत्त्वाची लढाई!
महाबोधी महाविहार केवळ एक पर्यटन स्थळ किंवा धार्मिक स्थळ नाही, तर ते संपूर्ण बौद्ध समुदायासाठी सर्वात पवित्र तीर्थक्षेत्र आहे. त्याच्या संरक्षणासाठी आणि धार्मिक स्वायत्ततेसाठी लढा देणे प्रत्येक बौद्ध अनुयायाचे कर्तव्य आहे. महाबोधी मुक्ती आंदोलनाला पाठिंबा द्या, या आंदोलनाची माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि बौद्ध धर्माच्या हक्कांसाठी आवाज उठवा!
— धम्म भारत ( DhammaBharat.com )
MahabodhiMuktiAndolan #BodhGaya #BuddhistsRights #DhammaBharat #FreeMahabodhiVihar #BuddhistUnity
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत