देशमहाराष्ट्रमुख्यपानविचारपीठ

असे काम कुठेही करतांना दिसत नाहीत,.??

डॉ.जयप्रकाश बोधी,

डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या मातृत्व संघटना बांधणी मजबुत करुन आपल्या समाजातील लोकांवर अन्याय अत्याचार होतात,
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळे,बौध्द विहार तोड फोड करतात..ईतर समाज मधील सनातनी लोक..तेंव्हा समता सैनिक दल चे काम असते त्या गावात तालुक्यात जिल्हयात शहरात राज्यात जावून त्यांना संरक्षण देण्याचे… करण्याचे …
पण असे काम कुठेही करतांना दिसत नाहीत,.??

जसे दीक्षा भूमी नागपुर बचाव आंदोलन करण्यासाठी समता सैनिक दल चे केंद्रीय प्रमुख, जिल्हा संघटक व त्यांचे मार्शल स्वतःला लावणारे एकही आलेले नव्हते.
उलट यांनी स्मारक समितीचे संचालक मंडळ दीक्षा भूमी नागपुर यांना सपोर्ट केलेला होता. तिस फूट खोदकाम अंडरग्राऊंड बांधकामाबाबत , दोन हॉल,car parking मलनिस्सारण केन्द्र होणार होते, त्यामुळे दीक्षा भूमी नागपुर चे स्तूपला भेगा पडलेल्या होत्या.
स्तूपाच्या आत मध्ये रातोरात चार लोखंडी पिलर खांब लावण्यात आले.
अशी गंभीर परिस्थिती असताना कोणीही समता सैनिक दल चे सैनिक यांनी विरोध केला नाही.
आणि सर्व भारतीय नागरिकांनी आंदोलन करून दीक्षा भूमी नागपुर येथे होणाऱ्या बांधकामाबाबत अंडरग्राऊंड दोन हॉल,car parking मलनिस्सारण केन्द्र होणार होते, ते पूर्णपणे बंद करण्यासाठी
ता.१/७/२०२४ बौदधधर्मीय लोकांनी काम बंद पाडले.
स्मारक समितीचे संचालक मंडळ यांनी बांधकाम बंद करीत आहोत असे जगजाहीर पने आव्हान केले व लेखी पत्र लिहून आंदोलन कर्त्यासमोर येवुन दिले.

पण आपल्याच काही लोकांनी जेसीबी machine बोलावून पैसे गोळा करून खोदलेले खड्डे बुजविण्यासाठी विद्रोही भुमिका बजावली गेली, त्यामुळे काही आंदोलन कर्त्यावर पोलिसांनी fir दाखल केली होती. विनाकारणच ..

अश्यावेळी स्वतःला प्रामाणिक आंबेडकरवादी स्वाभिमानी बौध्द समाजाचे नेतृत्व करणारे व्यक्ती ऍड. चीमंनकर, राष्ट्रीय अध्यक्ष, समता सैनिक दल यांनी आपली भुमिका अलग घेवुन समता सैनिक दल चे तुकडे केले आहेत.
आणि यांचे शिष्य मार्शल स्वतःला म्हणुन सामाजिक बांधिलकी जपून निःस्वार्थ काम करीत नाहीं आहेत आणि समता सैनिक दल चे वतीने कार्यक्रमाचे आयोजन करतात व लोकांकडून पैसे गोळा करून काम करीत आहेत. हप्ता वसुली करणे ह्यांचा धंदा तेजीत सुरू केलेला दिसत आहे.
राष्ट्रिय केंद्रीय संघटक, मार्शल हि पदव्या लावून परेड शिबीर घेणे, मोजक्याच लोकांची… आणि प्रसारासाठी म्हणतात आम्ही समाजाचे काम करीत आहोत.

दीक्षा भूमी नागपुर बचाव कृती समिती स्थापन करण्यासाठी दोन वेळा मीटिंग banai येथे आयोजित करण्यात आली होती.
त्याचे संयोजक ऍड chimankar चे चेले sariput, बोंदाडे, प्रा.रणजित मेश्राम,जयंत इंगळे banai, छाया खोब्रागडे व ईतर यांनी
दीक्षा भूमी बचाव करण्यासाठी विरोध केलेला होता.
हेच लोक स्वतःच्या पोटासाठी स्वार्थ साधण्यासाठी वेगवेगळ्या युक्त्या लढवून स्वतःच्या प्रसिद्धि मिळाली पाहिजेत यासाठी…प्रत्यक्षात सामाजिक चळवळ राबवित आहोत म्हणुन आंबेडकरी समाजाचे अनुयायी यांना गुमराह करण्याचे काम करीत आहेत.
ह्यांचा विरोध दीक्षा भूमी बचाव मोहिमेत सहभागी झालेले बौद्ध अनुयायी यांनी सरळ सरळ खडेबोल सुनावले कि, आपण सर्वांनी मिळुन दीक्षा भूमी बचाव मोहिमेत सहभागी झालेले नाहीत, सपोर्ट केलेले पाहिजेत होते ते काम केलेले नाही आहेत,तर कोणत्या आधारावर कृती समिती स्थापन करणार आहात, ह्याचे कारण असे म्हणता येईल की, आपण खरंच आंबेडकरी समाजाचे नेतृत्व करणारे असते तर आपणास हि कृती समिती स्थापन करण्यात काहीही हरकत नव्हती, पण आपण आपल्या परीने स्वतःचे स्वार्थ साधण्यासाठी वेगवेगळ्या युक्त्या लढवून कृती समिती स्थापन करणार आहेत, हे चुकीचे आहे आणि आपण स्वार्थ साधण्यासाठी काम करीत आलेले आहेत.
असा स्पष्ट आरोप दीक्षा भूमी बचाव मोहिमेत सहभागी झालेले बौध्द अनुयायी यांनी केला.
त्यामुळे दीक्षा भूमी नागपुर बचाव कृती समिती स्थापन केली नाही??

Sariput सुनील मार्शल स्वतः व त्यांचें समता सैनिक दल चे मार्शल दीक्षा भूमी नागपुर येथे होणाऱ्या धम्म चक्र परिवर्तन दिनाच्या दिवशी संरक्षण म्हणुन काम करीत नाहीत??
आणि कुठल्याही, मोर्च्यात,आंदोलनात सहभागी होत नाहीत??
डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेलें समता सैनिक दल ता.१९/३/१९२७. हे शूरवीर निष्ठावंत मार्शल होते.

आजचे समता सैनिक दल चे सैनिक बिना कामाचे आहेत.

अश्यावेळी आंबेडकरी अनुयायी यांना गुमराह करण्याचे काम करतांना दिसत आहेत.
अश्यापासून सावधान सावधान राहून काम केले पाहिजेत.

जनहितार्थ जारी

डॉ.जयप्रकाश बोधी, नागपुर

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!