आरक्षणासाठी, संविधानासाठी लाठ्या-काठ्या खाणे बंद करा ❗️

महाराष्ट्रात (२०११ सर्व्हे नुसार) आंबेडकरी बौद्धांची लोकसंख्या ५% आहे आणि भारतात ०.८% आहे, आरक्षणाचा सर्वाधिक लाभ घेणाऱ्या ५००० हून अधिक जाती “हिंदू” आहेत. बहुजन नाही, मुलनिवासी नाही, वंचित नाही, किंचित नाही,हिंदूच आहेत.
११०८ अनुसूचित जातींपैकी एक छोटासा समाज असून तुम्हाला कश्याला सगळ्यांसाठी मार खायचा आहे? सगळे मलाई खातात आणि निळा झेंडा दिसला की शिव्या देतात “ह्यांना आंबेडकरांनी सवलती दिल्यात”.
आरक्षणासाठी रस्त्यावर उतरू नका भाजप आरक्षण कधीच बंद करणार नाही
कारण सगळ्यात मोठी “कट्टर हिंदू” व्होट बँक ओबीसी आहे, ओबीसींचा पोट भरलं की त्याचा श्रेय ते धर्माला देणार, गरिबीमुळे ख्रिश्चन होणार नाही, म्हणून हिंदुत्व जिवंत आहे. आरक्षण = हिंदुत्व.
संविधानासाठी तर आपल्याला अजिबात रस्त्यावर उतरायची गरज नाही कारण बहुसंख्य लोकच जर इतके भिकारचोट असतील, देशाच्या घटनेचा अपमान त्यांना चालत असेल, तर आपले प्रदर्शन कोणासाठी व कशासाठी?
राहिला विषय बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या विटंबनेचा, तर त्या विरोधात जरूर आंदोलन करावे पण शांततेत. भावनिक होणे सोडून द्या, आजही अनेकांची खाजगीत आपल्याबद्दल आणि बाबासाहेबांबद्दल मते संतापजनक आहेत हे वास्तव स्वीकारा, आपल्या समाजाच्या आर्थिक व शैक्षणिक प्रगतीसाठी कार्य करा, ‘शहरा कडे चला’ आणि लक्षात ठेवा: सूर्याची विटंबना होऊ शकत नाही.
खूपच जास्त राग येत असेल तर थोडा पैसा घेऊन साऊथ मुंबईला फिरायला या, द टेबल, गेलॉर्ड, वसाबी, किंवा महागड्या रूफ टॉपमध्ये एक रात्र डिनर करा आणि आजूबाजूच्या लोकांचा निरीक्षण करा. १०-२० करोड खिशात कार्डमध्ये घेऊन फिरणारे हाय व्हॅल्यू लोकं पाहा, त्यांना घंटा घेणं देणं नाही तुमची जात धर्म काय आहे. अशाच एका ठिकाणी काला घोडा मुंबई परिसरात ‘वे साईड इन’ नावाच्या कॅफे मध्ये बाबासाहेब कॉफी घ्यायचे त्या काळी आणि लिखाण करत बसायचे.आपल्याला महापुरुषांच्या मार्गावर चालून महापुरुषांचा अनुकरण करायचा आहे.
१०० रुपयाचा पेट्रोल टाकणाऱ्या अशिक्षित गटर छाप व्यक्तीने बाबासाहेबांबद्दल काहीतरी चुकीचं बोललं म्हणून भांडत बसायची गरज नाही M.A(2), M. Sc, D. Sc, PhD, LLD, D. Litt and Barrister-at-law केलेला कोणी माई का लाल कोणी माई का लाल असेल तरच उत्तर द्या.
युवकांनी रस्त्यावर उतरून उलट सुलट चाळे करून अटक होऊन आपले करिअर संपवू नका, पोलिसांनाही जात असते.. जीव गमवाल, ह्या गोष्टी मनात ठेवा आणि फक्त शिक्षणात लक्ष द्या.
१ पिढी जाईल आपली, २ पिढ्या जातील, ३ पिढ्या जातील, पण जर संख्येने कमी असून पारसी, ज्यू,सिख किंवा जैन लोकांसारखे आपण सक्षम संपन्न झालो, तर एकदिवस नक्कीच स्वप्नातही आपलं कोणी काही वाकडं करू शकत नाही.
जय भीम 🇮🇳
By सम्यक बुद्धीस्ट
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत