देहू रोड , बुद्ध विहार
मुबई-पुणे या हमरस्त्यावर देहू रोड येथे एक बुध्द विहार बांधण्यात आले होते. त्या विहारात बुद्ध मूर्तीची प्रतिष्ठापना करण्याचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मान्य केले होते.
त्या विहारात बुद्ध मूर्ती बसवण्यासाठी बाबासाहेबांनी खास रंगूनहून बूध्दमूर्ती आणलेली होती. अगदी सारख्या असणाऱ्या दोन मूर्त्या आणलेल्या होत्या.
बाबासाहेबानीं अनेक मूर्त्यामधून डोळे उघडे व प्रवचन मुद्रा असलेली मूर्ती निवडलेली होती.
बाबासाहेबांना डोळे बंद करून एकाच ठिकाणी ध्यानस्थ बसलेला बुद्ध अभिप्रेत नव्हता.
बाबासाहेब म्हणत की.
“भ. बुध्द देशाच्या कानाकोपऱ्यात आयुष्यभर अखंडपणे डोळे उघडे ठेवून फिरत राहिले.जगाचे दुःख त्यांनी डोळसपणे पाहिले आणि त्यांचे हे भ्रमण अक्षरशः पायी चालत असे. त्यांनी कधीही कोणतेही वाहन वा साधन भ्रमणासाठी वापरले नाही”
आणि म्हणून- बाबासाहेबांना डोळे उघडे असलेला बुध्द अभिप्रेत होता.
रंगूनहून आणलेल्या दोन मूर्त्यापैकी एक बाबासाहेब राहात असलेल्या २६ ,अलिपूर रोडच्या बंगल्यात काचेच्या चौकटीत हॉलमध्ये ठेवलेली होती.
या मूर्तीसमोरच रोज सकाळ -संध्याकाळ बुद्ध वंदना म्हणत असायचे.
त्यापैकी दुसरी मूर्ती देहू रोड येथील विहारास डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भेट दिली.
देहू रोड येथे २५ डिसेंबर,१९५४ रोजी हा सोहळा आयोजित करण्यात आला होता.
संदर्भ – डॉ . आंबेडकरांच्या सहवासात
डॉ.सविता भीमराव आंबेडकर.
सुलभ संदर्भासाठी देहू रोड येथील बुध्दमूर्ती चा फोटो
👇
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत