बसपा ची संविधान चौकात निषेध व निदर्शने
????बहुजन समाज पार्टीचे तामिळनाडू प्रदेशाध्यक्ष आर्मस्ट्रॉंग यांची काल राजकीय द्वेष भावनेतून त्यांच्या चेन्नई च्या पेरंबुर येथे निर्घृण हत्या करण्यात आली. आर्मस्ट्राँग हे कांशीराम साहेबांच्या तालमीतील व तामिळनाडू मधील लोकप्रिय नेते होते.
????आर्मस्ट्राँग वरील भ्याड हल्ल्याच्या घटनेचा निषेध करून तामिळनाडू सरकारने त्यांच्या मारेकर्यांना विनाविलंब अटक करून कठोर शिक्षा द्यावी यासाठी बसपा च्या वतीने आज बसपा नेते उत्तम शेवडे यांच्या नेतृत्वात नागपुरातील संविधान चौकात निषेध व निदर्शने करुन आर्मस्ट्रॉंग यांना आदरांजली व्यक्त केली. सुरुवातीला भिक्खू डॉक्टर भदंत धम्मोदय यांच्या हस्ते बाबासाहेब आंबेडकरांना माल्यार्पण करण्यात आल
????याप्रसंगी माजी जिल्हा प्रभारी राहुल सोनटक्के, सुनील कोचे, माजी जिल्हाध्यक्ष संदीप मेश्राम, योगेश लांजेवार, चंद्रशेखर कांबळे, उमेश मेश्राम, सदानंद जामगडे, रामकुमार गोणेकर, वर्षा वाघमारे, बुद्धम राऊत, प्रवीण पाटील, विकास नारायणे, शशिकांत मेश्राम, अंकीत थूल, सचिन मानवटकर, स्वप्नील ढवळे, गोपाल मेश्राम, असित दुर्गे, अनिल मेश्राम, चंद्रशेखर वानखेडे, मॅक्स बोधी, अभिलेश वाहाने, नितीन वंजारी आदी बसपा चे आजी-माजी पदाधिकारी, कार्यकर्ते व हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
✍️उत्तम शेवडे (9421800219)????
????मीडिया प्रभारी, महाराष्ट्र प्रदेश बसपा????
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत