निवेदिता सराफ काकु. अक्कल अक्कलकोटला नेऊन ठेवलीय का?

डॉ. विजय रणदिवे
तुम्ही तुमच्या स्वामींवर श्रद्धा ठेवा अथवा स्पायडरमॅनवर. तुमचा तो संविधानिक अधिकार आहे. परंतु गाडगे महाराजांचं नाव घेण्याआधी जरा विचार करत चला.
स्वामींचं चरित्र वाचून भारावून गेलात? नेमकं काय वाचून भारावून गेलात? मुंगीपैठणच्या विठाबाईची गोष्ट वाचून भारावून गेलात का?
गाडगे महाराजांशी तुलना कशावरून?
गाडगे महाराज अंगभर कपडे नेसायचे. ते फाटके तुटके असले तरी स्वच्छ असायचे.
गाडगे महाराज लोकांच्या चुलीत हागत नव्हते अन कुणाच्या विहिरीत मुतत नव्हते. उलट ते गावोगावी फिरून स्वच्छता करण्यासाठी झाडू मारायचे. लोकांनाही स्वच्छतेचं महत्व पटवून द्यायचे.
गाडगे महाराज लोकांना बुवाबाजी चमत्कार जादूटोणा अंधश्रद्धेपासून परावृत्त करायचे. किर्तनाच्या माध्यमातून प्रबोधन करत गावोगावी फिरायचे.
गाडगे बाबा दीन-दुबळ्या आजारी गरिबांची सेवा करायचे. कुष्ठरोग्यांना जेऊ खाऊ न्हाऊ घालायचे.
गाडगे बाबांनी जागोजागी धर्मशाळा बांधून बेघर लोकांच्या राहण्याची सोय केली.
गाडगे बाबा कधी कोणत्या महिलेशी अश्लील भाषेत बोलले नाहीत कि अश्लील वर्तन केलं नाही.
गाडगे बाबांनी स्वतःचं मंदिर किंवा आश्रम उभं करुन तिथं करोडोची माया जमवली नाही कि कांड केले नाहीत.
गाडगे बाबा अशिक्षित असले तरीही शिक्षणाचं महत्व पटवून सांगायचे, वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवून चमत्कार इत्यादी अवैज्ञानिक गोष्टींची पोल खोल करायचे.
गाडगे बाबा तर्क विवेक आणि बुद्धीप्रामाण्यवाद कसा वापरायचा ते शिकवायचे.
गाडगे बाबांशी कुणाचीही तुलना करण्याचं धाडस करु नका.
आणि हो, निवेदिता काकु म्हणतायत स्वामी कुठल्याही चमत्कारांच्या विरोधात होते. तर मग त्यांचे भक्त सतत त्यांचे चमत्कारीक अनुभव प्रचित्या का बरं शेयर करत असतात?
त्यांच्या पोथ्या चमत्कारांच्या कथांनी भरभरून का आहेत?
स्वामींवर इतका भरोसा आहे म्हणे कि त्यांचं नाव घेऊन वरून उडी मारली तरी ते झेलून घेतील. तर मग प्रात्यक्षिक करुन दाखवाल का कॅमेरासमोर? काहीही बरळायचं? काही सामाजिक जवाबदारीचं भान असु द्याल का नाही?
तुमच्या सारख्या सेलिब्रिटिज कधी चेंगराचेंगरीत मरत नाहीत. मरतात भोळे भाबडे गरीब बहुजन. आणि ते बिचारे तुमच्या सारख्या सुशिक्षित सुसंस्कृत सक्सेसफूल लोकांना आपला आदर्श मानत असतात. तुमच्या शब्दांवर विश्वास ठेवत असतात. त्यांच्या जीवाची काही पर्वा आहे कि नाही तुम्हाला?
ह्या मराठी सेलिब्रिटिजमधे आपसात (ह्यांना सेलिब्रेटी म्हणून उगाचच मान द्यावा लागतो ) अश्या अवैज्ञानिक आणि खोट्या गोष्टींचा प्रचार करण्याची एवढ्यात एक स्पर्धाच जणु लागली आहे. ह्यातून ह्यांना काय लाभ होत असावा ही शंका माझ्या मनात नेहमीच येते. ह्यांना काय लाभ होत असेल तो होऊ देत, परंतु ह्यांचं ऐकून बहुजनांनो तुम्ही चेंगराचेंगरी सारख्या घटनांना बळी पडू नका.
अंधश्रद्धा आणि धार्मिक कट्टरतेपायी आपल्या महाराष्ट्राने आधीच भयंकर नुकसान झेललं आहे. आतातरी बुद्धी आणि विवेक वापरा.
✍????डॉ. विजय रणदिवे
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत