संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमधील आंबेडकरी योगदान

संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे उजवे हात मानले जाणारे झुंझार सेनानी डॉ. आर.डी. भंडारे यांचा सिंहाचा वाटा होता. २८ नोव्हेंबर १९४९ रोजी मुंबई महापालिकेत संयुक्त महाराष्ट्राचा पहिला ठराव आचार्य अत्रे व डॉ. आर.डी. भंडारे यांनी ‘मुंबईसह महाराष्ट्र’चा ठराव शेडयुल्ड कास्ट फेडरेशनच्या (Scheduled Caste Federation) वतीने मांडला. स्वतंत्र विदर्भाची निर्मिती होऊ नये म्हणून, ह्या संपूर्ण भागासाठी नागपूर करार करण्यात आला. या करारानुसार विदर्भ, संयुक्त महाराष्ट्र व मराठवाडा या तीन विभागांतील नेत्यांनी सह्या केल्या.
भाषावार प्रांतरचनेत आंध्र प्रदेशचा जन्म झाला व चळवळ आणखी जोर धरू लागली. महाराष्ट्रात ही गडबड चालू असताना स्वतंत्र आंध्रच्या मागणीसाठी पोट्टी रामलू यांनी बलिदान दिले. आंध्रात वातावरण पेटले, त्यामुळे १९५२ मध्ये स्वतंत्र आंध्र अस्तित्वात आला. मराठी भाषिकांच्या निर्मितीसाठी ३ फेब्रुवारी १९५६ रोजी संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना झाली.संयुक्त महाराष्ट्र समितीने पहिल्या वर्षी डॉ. आर.डी. भंडारे, नंतर एस. म. जोशी, नंतर उद्धवराव पाटील असे एक-एक वर्षाचे विरोधी पक्ष नेतेपदाचे वाटप झाले. २२ डिसेंबर १९५५ रोजी राम जोशी व डॉ आर.डी. भंडारे यांच्या पूर्वनियोजित ठरावावर मतदान झाले.
हा संयुक्त महाराष्ट्राचा ठराव ६३ विरुद्ध शून्य मतांनी संमत झाला आणि हा ऐतिहासिक दिवस ठरला. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेसाठी हा महत्त्वाचा विजय मिळाला होता. ८ मे १९५९ रोजी डॉ. आर.डी. भंडारे यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी सहकार्य करणे म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिज्ञेची पूर्तता करणे असा खुलासा केला. १०६ जणांच्या हुताम्याच्या बलिदानामुळे मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाली. या चळवळीमध्ये सर्व जाति धर्मांच्या नेत्यांचा सहभाग होता.
या चळवळीत डॉ. आर.डी. भंडारे, आचार्य अत्रे, प्रबोधनकार ठाकरे, एस.एम.जोशी, दादासाहेब गायकवाड, अण्णा डांगे, नाना पाटील, सेनापती बापट, ना.ग.गोरे, जयंतराव टिळक अशा नेत्यांसह एकूण ११ घटक पक्षांचा यात समावेश होता. यात कांग्रेसचा समावेश नव्हता. या समितीने १९५७ सालची लोक सभा आणि विधानसभा निवडणूक लढवली. त्यात बलाढ्य काँग्रेसच्या विरोधात निवडणुकीत या समितीला ३९८ जागांपैकी तब्बल १५५ जागांवर विजय मिळाला. स्वाभाविकच ही समिती प्रमुख विरोधी पक्ष बनली. आणि डाॅ. आर.डी. भंडारे यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या पहिल्या विरोधी पक्षनेते पदाचा मान भुषविला.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत