राष्ट्रपती पुरस्कारांमधे १ हजार १३२ जवानांना शौर्य आणि सेवा पदकं जाहीर…
महाराष्ट्रातले अतिरिक्त पोलीस महासंचालक निकेत कौशिक, विशेष पोलीस महानिरीक्षक दिलीप सावंत, पोलीस आयुक्त मधुकर पांडे, आणि पोलीस निरीक्षक मधुकर कड ४ पोलीस अधिकाऱ्याना विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पदक जाहीर झालं आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त पोलीस, अग्निशमन सेवा, गृहरक्षक आणि नागरी संरक्षण आणि सुधार सेवेतील १ हजार १३२ जवानांना शौर्य आणि सेवा पदकं जाहीर झाले आहेत. यामध्ये दोन राष्ट्रपती शौर्य पदक, २७५ शौर्य पदकं. राष्ट्रपती विशेष सेवा पदकं आणि ७५३ गुणवत्तापूर्ण सेवा पदकांचा समावेश आहे. १८ पोलीस जवानांना शौर्य पदकं आणि ४० पोलीस जवानांना गुणवत्तापूर्ण सेवा पदकं जाहीर झाली आहेत. गृहरक्षक आणि नागरी सेवासाठी ७ पदकं, तर सुधारात्मक सेवेसाठी ९ पदकं जाहीर झाली आहेत. अग्निशमन सेवेसाठी महाराष्ट्रातल्या ६ अधिकाऱ्यांना गुणवत्तासेवेसाठीची पदकं जाहीर झाली आहेत. यामध्ये राज्यातल्या आदिका राजाराम पाटील, प्रियंका भारत काळे आणि सोनाली सुनील बालोडे यांना जीवन रक्षक पदक जाहीर झालं आहे. तीन जणांना मरणोत्तर हा पुरस्कार मिळाला आहे. ३१ जणांना जीवन रक्षा पदक श्रृंखला पुरस्कार – २०२३ नं गौरवलं जाणार आहे. यात ३ सर्वोत्तम जीवन रक्षा पदक, ७ उत्तम जीवन रक्षा पदक आणि २१ जीवन रक्षा पदकांचा समावेश आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत