राजमाता जिजाऊ गीत

शिवरायांच्या इतिहासाचे वदे सुवर्णपान।
आई जिजाऊ तुलाच देऊ जगात पहिला मान।।
तुझ्यामुळे ग पुनीत झाली सिंदखेड नगरी।
शिवजन्माने तसाच पावन झाला शिवनेरी।
।स्वराज्याचं या मुलुखाला तूच दिलं वरदान।
आई जिजाऊ तुलाच देऊ जगात पहिला मान।
।तुझ्याच नयनी स्वराज्य दिसलं तुझ्या शिवाजीला।मराठमोळे मर्द मावळे घेवून संगतीला।
।प्राणपणाने लढून राखली माय भूमीची शान।
आई जिजाऊ तुलाच देऊ जगात पहिला मान।
।वऱ्हाडातलं सिंदखेडराजा तालुक्याचं गाव।
तुझ्याच जन्मामुळे ग आई जगात झालं नाव।
।तुझ्या करारी बाण्यापुढती झुकून जाते मान।
आई जिजाऊ तुलाच देऊ जगात पहिला मान।
।सिंदखेडचा लखुजी राजा मोठा रणझुंझार।
जिजाऊमाता लेक तयाची तू मोठी कर्तबगार।
।तुझ्याच रक्तामधी उतरलं लखुजीचं अवसान।
आई जिजाऊ तुलाच देऊ जगात पहिला मान।
।सिंदखेडच्या परिसरातील गाणारा शाहीर।
तव गुण गाता आज इथे तो झाला जगजाहीर।
।तुझी थोरवी गाण्याराला मिळे जगी सन्मान।
आई जिजाऊ तुलाच देऊ जगात पहिला मान।
राजमाता जिजाऊ यांना विनम्र अभिवादन 12 जानेवारी ***
*संकलन:* भीमराव तायडे, 9420452123[शाहीर/ गायक आयु. नागसेन सावदेकर यांनी गायिलेल्या/ रेकॉर्डिंग केलेल्या गीतावरून हे गीत शेअर केले आहे; गीतकार: शाहिर डी. आर. इंगळे, बुलडाणा।]
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत