महाराष्ट्रमुख्यपान
अहमदनगर जिल्ह्यातील आळेफाटा इथं झालेल्या कार अपघातात ५ जण जागीच ठार.

महाराष्ट्राच्या अहमदनगर जिल्ह्यातील आळेफाटा जुन्नर येथून छत्रपती संभाजी नगर कडे जात असताना एका कारचा अपघात झाला. नेवासा फाटे नजीक त्रिमूर्ती संकुलाजवळ रस्त्यात पडलेल्या टायरला धडकून ही कार बाजूच्या कठड्याला धडकली आणि जवळच्या ओढ्यात बुडाली. या अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. सर्व प्रवासी स्कोडा गाडीतून प्रवास करत होते. ही घटना रविवारी मध्यरात्री अकराच्या सुमाराला घडली. मृतांमध्ये एका मुलीसह तीन महिला आणि चालकाचा समावेश आहे. या अपघातात एक चिमुकली बचावली असून तिच्यावर उपचार सुरू आहेत.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत