
सुधारणा झाल्या नाहीत तर संयुक्त राष्ट्रांची परिणामकारकता हळूहळू नाहीशी होईल अशी भीती त्यांनी व्यक्त केली. संयुक्त राष्ट्रांच्या पुनर्रचनेची गरज असल्याचं मत परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांनी व्यक्त केलं आहे. ते काल बेंगळुरू इथं एका कार्यक्रमात बोलत होते. जागतिक स्तरावर भारत हा मुद्दा वारंवार उपस्थित करत असल्याचं त्यांनी सांगितलं.
भारत चीन संबंधांबद्दल बोलताना ते म्हणाले की चीन सीमाभागाशी संबंधित कराराचं पालन करत नसल्यामुळे द्विपक्षीय संबंधांमध्ये तणाव आहे. भारत सध्या प्रगतीच्या मार्गावर असून २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र होण्याची भारताची महत्त्वाकांक्षा पूर्ण होईल असा विश्वास जयशंकर यांनी व्यक्त केला.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत



