
संरक्षण मंत्रालयानं १०१ संरक्षण उत्पादनांच्या आयातीवर टप्प्याटप्प्यानं बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. बंदी घातलेली सर्व उत्पादनं भारतातच तयार केली जातील अशी माहिती संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज ट्वीटरवरून दिली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मांडलेल्या आत्मनिर्भर भारत ही संकल्पनेला चालना देण्याच्यादृष्टीनं हे एक महत्त्वाचं पाऊल असल्याचं राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. या निर्णयामुळे संरक्षण साहित्य उत्पादन क्षेत्रातल्या भारतीय उद्योजकांना, स्वतःची क्षमता वापरुन ही उत्पादनं विकसित करण्याची मोठी संधी उपलब्ध होईल. यासाठी गरज वाटली तर ते संरक्षण संशोधन आणि विकास संस्था अर्थात डीआरडीओ ची ही मदत घेऊ शकतात असं राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. याअंतर्गत भारताच्या तीनही संरक्षण दलांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी येत्या ६ ते ७ वर्षात या भारतीय उद्योजकांसोबत सुमारे ४ लाख कोटी रुपयांचे करार केले जाणार त्यांनी सांगितलं.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत