
पुणे कंपनीच्या आणि नागपूर इथल्या प्रकल्पात लष्करासाठीच्या या फ्यूज तयार केल्या जाणार आहेत. त्यामुळे दीड लाख मनुष्य दिवसांची रोजगार निर्मिती होणार असल्याचं मंत्रालयानं म्हटलं आहे. संरक्षण मंत्रालयानं पुण्याच्या भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडशी इलेक्ट्रॉनिक फ्युज खरेदीसाठी प्रस्ताव केला आहे. पाच हजार ३३६ कोटी रूपयांचा हा करार १० वर्षांसाठी आहे. स्वदेशी संरक्षण उत्पादनाला चालना देण्यासाठी केंद्र सरकारच्या उपक्रमाअंतर्गत हा करार झाला आहे. लष्करासाठी लागणाऱ्या सामानाची आयात कमी करून देशातच त्याचं उत्पादन करणं, प्रमुख तंत्रज्ञान आत्मसात करणं आणि पुरवठा साखळीमुळे विस्कळीत झालेला साठा सुरक्षित करणं हा त्याचा हेतू आहे, अशी माहिती मंत्रालयानं दिली.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत