मराठी विज्ञान अधिवेशनात डॉ. प्रमोद चौधरी यांचे प्रतिपादन

हवामान बदलामुळे संपूर्ण जगासमोर मोठे आव्हान उभे आहे. यासाठी ऊर्जा संक्रमणातून पुढे येणारे नवे पर्याय शोधणे ही आता काळाची गरज ठरत आहे. ऊर्जा संक्रमणातून तयार होणारी नवी जैव अर्थव्यवस्था ही भारतातील प्रदूषण नियंत्रणाचा परिणामकारक उपाय ठरू शकते, असे प्रतिपादन प्राज इंडस्ट्रीजचे अध्यक्ष डॉ. प्रमोद चौधरी यांनी वाशी येथे आयोजित ५८ व्या अखिल भारतीय मराठी विज्ञान अधिवेशनात केले.
मराठी विज्ञान परिषद, नवी मुंबई विभाग आणि मराठी साहित्य संस्कृती कला मंडळ, वाशी यांच्या वतीने अखिल भारतीय मराठी विज्ञान अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे. नवी मुंबईतील वाशी येथील साहित्य मंदिर सभागृहात शनिवारपासून सुरू झालेल्या या अधिवेशनाचे उद्घाटन नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर, मराठी विज्ञान परिषदेचे अध्यक्ष प्राध्यापक ज्येष्ठराज जोशी, प्रा. मनमोहन शर्मा, डॉ. सोमक रायचौधरी, सुभाष कुलकर्णी, डॉ. किशोर कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत