ठाणे जिल्ह्यातील रुग्णालयात तृतीय पंथीयांसाठी स्वतंत्र कक्ष

तृतीयपंथीयांसाठी रुग्णालयामध्ये स्वतंत्र कक्ष सुरू करण्याचा महाराष्ट्रातील पहिला मान ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयाला मिळाला आहे. किन्नर अस्मिता संस्थेच्या सौजन्याने आणि सत्त्वा संस्थेच्या ‘कम्युनिटी लेड मॉनिटरिंग’ या उपक्रमांतर्गत या स्वतंत्र वॉर्डची उभारणी करण्यात आली आहे अतिदक्षता विभागातील सुविधांसह स्वतंत्र खाटांची व्यवस्था येथे करण्यात आली आहे.
उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. मनोहर बनसोडे यांनीही त्यासाठी पुढाकार घेतला. त्यानंतर रुग्णालयात चार स्वतंत्र खाटांचे कक्ष तयार करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या. अखेर महाराष्ट्रातला तृतीयपंथीयांसाठीचा पहिला वॉर्ड उल्हासनगरमध्ये अस्तित्वात आला आहे.
तृतीयपंथीयांना रुग्णालायातील कोणत्या कक्षामध्ये दाखल करावे, असा प्रश्न असतो. त्यामुळे तृतीयपंथीयांची फरपट होते. अशात वेळीच उपचार मिळाल्याने त्यांचा आजार गंभीर स्वरूप धारण करू शकतो. ही गरज ओळखून किन्नर अस्मिता संस्थेने तृतीयपंथीयांसाठी शासकीय रुग्णालयात स्वतंत्र कक्ष उभारावा या संकल्पनेवर काम सुरू केले. सत्त्वा संस्थेच्या सहकार्याने उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात त्यासाठी तयारी सुरू करण्यात आली. नीता केणी, सिमरन सिंग यांनी यासाठी प्रयत्न केले.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत