
भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदी राहुल द्रविड यांच्यावरच ‘बीसीसीआय’ने विश्वास दाखवला असला, तरी मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये खेळण्यासाठी रोहित शर्मा आणि विराट कोहलीचे मन वळवण्यात त्यांना अपयश आले. दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी कसोटी संघाचे नेतृत्व रोहित शर्माकडे कायम ठेवण्यात आले असले, तरी ट्वेन्टी-२० मालिकेसाठी सूर्यकुमार यादव आणि एकदिवसीय क्रिकेटसाठी के.एल. राहुल यांना कर्णधार करण्यात आले आहे. दक्षिण आफ्रिकेत भारतीय संघ तीन ट्वेन्टी-२०, तीन एकदिवसीय आणि दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे.
एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेनंतर विशेषत: अंतिम सामन्यातील अपयशानंतर कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली प्रसिद्धीमाध्यमांपासून दूरच राहिले होते. मात्र, भविष्यात दोघेही मर्यादित षटकांच्या सामन्यांपासून दूर राहणार असेही त्यांच्याकडून सांगण्यात येत होते. यानंतरही आव्हानात्मक दौरा लक्षात घेता ‘बीसीसीआय’ रोहित शर्माला निर्णय मागे घेण्यासाठी गळ घालणार असा अंदाज बांधला जात होता. हा अंदाज निवड समितीच्या बैठकीत खोटा ठरला. दोघांनीही मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी विश्रांतीची केलेली मागणी निवड समितीने मान्य केली.
निवड समितीने कसोटीसाठी रोहित शर्माकडे कर्णधारपद कायम राखले. त्याच वेळी दुखापतग्रस्त हार्दिक पंड्याच्या जागी पुन्हा एकदा सूर्यकुमार यादववर कर्णधार म्हणून विश्वास दाखवला. क्रिकेटमधील या लघुतम प्रारूपातील संघात निवड समितीने आणखी एक मोठा निर्णय घेताना उपकर्णधारपदाची जबाबदारी रवींद्र जडेजाच्या खांद्यावर टाकली.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत