छत्तीसगडमध्ये काँग्रेस सरकार- पोल.

आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वीची लिटमस टेस्ट म्हणून पाहिल्या जाणाऱ्ऱ्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या निकालांची घोषणा ३ डिसेंबर रोजी होत आहे. तत्पूर्वी विविध संस्थांनी केलेले निवडणूक निकालपूर्व सर्व्हे प्रकाशित झाले आहेत. इंडिया टुडे आणि अॅक्सिसने केलेल्या सर्व्हेनुसार यानुसार छत्तीसगड राज्यात काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळण्याचा अंदाज आहे. ९० जागांपैकी ४० ते ५० जागा जिंकून काँग्रेस मुसंडी मारू शकते. तर काँग्रेस खालोखाल भाजप ३६ ते ४६ जिंकून काँग्रेसला तगडी टक्कर देऊ शकते, असा अंदाज आहे.
९ ऑक्टोबर रोजी केंद्रीय निवडणूक आयोगाने छत्तीसगडसहित ५ राज्यांच्या निवडणुकीची घोषणा केली. राजस्थान, म.प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोरममध्ये निवडणूक तारखांची घोषणा झाली. त्यानुसार ७ नोव्हेंबर ते १७ नोव्हेंबर या दहा दिवसांमध्ये छत्तीसगडमध्ये विधानसभेच्या एकूण ९० जागांसाठी मतदान पार पडलं. या जागांमध्ये १० जागा अनुसूचित जाती, तर २९ जागा अनुसूचित जमातीच्या प्रतिनिधींसाठी राखीव होत्या. मतदानाचा निकाल ३ डिसेंबर २०२३ रोजी जाहीर होणार आहे. तत्पूर्वी . इंडिया टुडे आणि अॅक्सिसने केलेल्या सर्व्हेनुसार काँग्रेस पुन्हा सरकार स्थापन करू शकते, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत