गगनयान आणि आदित्य-एल1 दोन्ही मोहिमांमुळे मानवतेलाही मोठी मदत होत असल्याचं राष्ट्रपतींच प्रतिपादन

गगनयान आणि आदित्य-एल1 मोहिमेने केवळ अंतराळ क्षेत्रातच भारताचा दर्जा उंचावला नाही तर या दोन्ही मोहिमांमुळे मानवतेलाही मोठी मदत होणार आहे, असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटलं आहे. राष्ट्रपतीनी आज नवी दिल्ली इथं ‘२०४७ मधील एरोस्पेस आणि हवाई वाहतूक’ या विषयावरील दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषद आणि प्रदर्शनाचं उद्घाटन केलं. राज्यमंत्री जितेंद्र सिंह या वेळी उपस्थित होते.
संरक्षण आणि वाहतुकीसाठी स्वतंत्र तंत्रज्ञान तयार करून एरोस्पेस क्षेत्र परिवर्तनाच्या टप्प्यातून जात आहे. या क्षेत्रातील कर्मचार्यांचे कौशल्य वाढवण्याची गरज असल्याचं राष्ट्रपती म्हणाल्या. आंतरराष्ट्रीय तज्ञ, शास्त्रज्ञ, उद्योगपती, शैक्षणिक संस्था, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग, स्टार्ट-अप्स आणि विद्यार्थी यात सहभागी होणार आहेत. या दोन दिवसांत अनेक संस्था आणि विभागांचे प्रमुख या परिषदेत मार्गदर्शन करणार आहेत.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत