नवी मुंबई मेट्रो अखेर धावली, पण महाग तिकिटांवरुन प्रवाशांची नाराजी.

गेली १२ वर्ष प्रतीक्षेत असणारी नवी मुंबई मेट्रो काल दुपारी तीन वाजता पूजन झाल्यावर मेट्रो बेलापूर ते पेंधर या मार्गावर धावली. ११ किमी अंतराचा हा मेट्रो प्रकल्प गेली अनेक वर्ष प्रलंबित होता. अनेक अडथळे पार करून अखेर शुक्रवारच्या मुहूर्तावर मेट्रो सुरू झाली. दर १५ मिनिटांनी मेट्रोची एक फेरी असून एका मेट्रोची किमान एक हजाराहून अधिक क्षमता आहे.
मेट्रो सुरु झाली, याबाबत लोकांच्या मनात समाधान असले, तरी तिकीट दर सर्वसामान्य प्रवाशांच्या खिश्याला परवडणारे असावे, अशी मागणी काही प्रवाशांनी केली आहे.
चाळीसऐवजी २० ते ३० रुपये इतका तिकीट दर मेट्रोला ठेवल्यास तो परवडेल, असं काही जणांचं म्हणणं आहे. बेलापूर ते पेंधर हा मेट्रो प्रवास तळोजामधील कामगार वर्गासाठी अत्यंत फायद्याचा आहे. त्यामुळे तळोजा नोडला आता चांगले दिवस येतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत