घटनाविरोधी संघ-भाजप समर्थकांनो – विश्वंभर चौधरी

घटनाविरोधी संघ-भाजप समर्थकांनो, अमेरिकेत आता तिथली राज्यघटनाच तुमच्या मुलाबाळांना नागरिकत्व देऊ शकेल, ट्रंप तर तुमच्यावरच उलटला!
विवेक गमावला की माणूस पूर्णतः बुद्धीहीन झाल्यात जमा असतो. डोनाल्ड ट्रंपची आणि मोदींची मैत्री आहे या बावळट गृहीतकावर विसंबून मोदी भक्त ट्रंपची इतकी बाजू घेत होते जणूकाही ट्रंप भारताचाच राष्ट्राध्यक्ष होणार होता.
एरवी भारतीय वंशाच्या महिला उमेदवाराला कमला हॅरिस यांना इतर कोणी विरोध केला असता तर याच संघ भाजपवाल्यांनी आकाशपाताळ एक करून असं करणारांना देशद्रोही करून टाकलं असतं. पण संघ भाजपाच्या अमेरिकेतल्या समर्थकांनी तेही करून दाखवलं. विवेक पुरता गहाण टाकून ट्रंप आल्यावर भारताला मोदींमुळे महासत्ता कसं होता येईल वगैरे तारे दररोज तोडत होते. ट्रंपच्या समर्थनार्थ मेळावे आणि देणग्या सुरू होत्या. जणू काही ट्रंपची निवड म्हणजे मोदीचीच निवड इतका मस्तवालपणा चालला होता. आता शपथविधीलाही न बोलावल्यानं मैत्री सिद्धच झाली.
ट्रंप यांनी आल्याआल्या या उथळ एनआरआयना दणका दिला असून मुलांना जन्मानं मिळणारं नागरिकत्वच यापुढे मिळणार नाही. या निर्णयाचा मोठा फटका तिथे स्थायिक असलेल्या लोकांना बसणार आहे. त्यांची मुलं तिथं जन्मली तरी त्यांना नागरिकत्व मिळणार नाही.
आता त्यांना कदाचित मदत झाली तर ती अमेरिकी राज्यघटनेचीच होईल कारण ट्रंप यांना त्यासाठी घटनादुरूस्ती करून घ्यावी लागेल, तीही 75 टक्के राज्यांच्या संमतीसह. याचाच अर्थ अमेरिकेतल्या मोदी समर्थकांना आता तिकडच्या राज्यघटनेचाच शेवटचा आधार आहे.
यावरून तरी डोळे उघडतील आणि एका नेत्यापेक्षा राज्यघटना महत्वाची आहे हे या सुशिक्षित लोकांना कळेल अशी आशा करता येईल.
विश्वंभर चौधरी
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत