दिन विशेषदेशमहाराष्ट्रमुख्यपानविचारपीठ

अंधार फार झाला…पणती जपून ठेवा !


प्रजासत्ताक आणि संविधानाचा थेट संबंध असल्याने ; किंबहुना ‘प्रजासत्ताक’ हे ‘संविधाना’चेच अपत्य असल्याने गेल्या कित्येक वर्षांपासून आंबेडकरी जनतेची एक मागणी आहे. प्रजासत्ताकदिनी ध्वजारोहणाच्या प्रसंगी संविधानाचे शिल्पकार डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा ठेवण्यात यावी. परंतु नेहमीप्रमाणे या रास्त नि संयुक्तिक मागणीकडे दुर्लक्ष/ कानाडोळा करण्यात येत आहे.
संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात संविधानकाराचे तैल चित्र लावण्यासाठीही बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर सुमारे साडेतीन दशकांचा कालावधी लागला. ‘भारतरत्न’ देण्याबाबतही तेच ! खेदाची बाब म्हणजे संसदेत संविधानकाराचे तैलचित्र लावण्याच्या मागणीचाही आंबेडकरी जनतेला सातत्याने पाठपुरावा करावा लागला होता. बाबासाहेबांचे तैलचित्र लावण्यासाठी सभागृहात जागाच नव्हती म्हणे ! मागितल्या शिवाय आंबेडकरी जनतेला काहीच मिळत नाही. ही कटू वस्तुस्थिती असून त्यासाठी त्यांना कायम संघर्ष करावा लागतो. मिलिंद महाविद्यालयाचे निर्माण बाबासाहेबांनी ज्या शहरात केले त्या मातीतील एक विद्यापीठ ज्ञानसूर्याच्या नावाने अलंकृत करा, या साध्या मागणीसाठी सुमारे 17 वर्षे संघर्ष करावा लागतो… रक्त सांडावं लागतं… बलिदान द्यावं लागतं… स्वतःची जळती घरे-दारे आपल्याच डोळ्यांनी बघावी लागतात… नामांतरासाठी एक पिढी कुर्बान करावी लागते…अन् शेवटी नामविस्तारावर गोड मानावं लागतं !
हा इतिहास असून तो जशास तसा आज डोळ्यासमोर तरळत आहे…

24 जानेवारी, 1950 रोजी हिंदुस्थान टाइम्समध्ये प्रसिद्ध झालेलं हे मार्मिक कार्टून बारकाईने बघा…
भारतमातेने Republic of India या बाळाला जन्म दिला असून डॉक्टर बाबासाहेबांच्या हातातील त्या नवजात बाळाकडे पंडित जवाहरलाल नेहरू, डॉ राजेंद्र प्रसाद आणि सरदार वल्लभभाई पटेल कुतुहलाने बघत आहेत…
एनवर अहमद यांचे हे कार्टून अत्यंत बोलकं असून 75 वर्षांनंतरही ते आपल्याशी बोलते !
राजकीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असलेल्या भारताच्या प्रजातंत्रावर मनूवाद्यांची एकतंत्री छाया दिवसेंदिवस घट्ट होत चालल्याने अंधार दस्तक देत असल्याचे जाणवत आहे.
अशावेळी काळोखावर मात करण्याची कुवत असलेले #संविधान ही आपल्याकडे असलेली एकमेव #पणती होय !
तिला जपणं ही प्रजासत्ताकावर निष्ठा असलेल्या प्रत्येकाचं दायित्व होय.
जागो !
नसता भविष्यकाळ आणखी अंध:कारमय असेल !!

अमृतमहोत्सवी प्रजासत्ताक दिनाच्या समस्त भारतियांना #हार्दिक_शुभेच्छा !
जय संविधान !!
जय भारत !!!

भीमप्रकाश गायकवाड,
‘मूकनायक’,
रविराजपार्क, परभणी

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!