राज्यात धोक्याची घंटा! सरकारने जारी केली अॅडव्हायजरी

ज्यातील वायुप्रदुषण व हवेची खराब झालेली गुणवत्ता याबाबत काय उपाययोजना कराव्यात याबद्दल महाराष्ट्र राज्य सरकारने राज्यातील सर्व जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा रुग्णालये आणि आरोग्य अधिकाऱ्यांसाठी अॅडव्हायजरी जारी केली आहे. देशाची राजधानी दिल्लीत हवेची गुणवत्ता ढासाळलेली असतानाच मुंबईत देखील हवा प्रदूषण वाढल्याचे पाहयला मिळत आहे.
राज्यात सर्वसाधारणपणे नोव्हेंबर ते फेब्रुवारी यादरम्यान हिवाळ्यात वातावरणातील प्रदुषित वायु व धुलिकण हवेतच राहिल्याने हवेची गुणवत्ता खराब होऊन या प्रदुषणाचे मानवी आरोग्यावर अनेक परिणाम होऊ शकतात. नोव्हेंबर २०२३ पासून राज्यात वेगवेगळ्या शहरात हवेची गुणवत्ता खराब होत असुन हवा गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) २०० च्या पुढे गेल्याचे आढळून आल्याचे शासनाने म्हटले आहे.
राज्य शासनाने प्रतिबंधात्मक काळजी घेण्याकरिता जनजागृती करणे तसेच वायु प्रदुषणाचे वाईट परिणाम होऊ शकतात अशा घटकांवर होणाऱ्या परिणामांपासून बचावासाठी सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत आरोग्य सल्ला देण्यात आला आहे. सर्व जिल्हे, महानगरपालिका यांन उपायोजना आणि जनजागृती कराव्यात असे सांगण्यात आले आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत