एसटीचे उत्पन्न ९१५ कोटींवर महिला सवलत योजनेमुळे

राज्य सरकारच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या महिला व ज्येष्ठ नागरिक या दोन्ही सवलत योजना राज्य परिवहन महामंडळाच्या पथ्यावर पडू लागल्या असून महामंडळाच्या तिजोरीत दरमहा भर पडत आहे. सवलती दिल्याने ही संख्या १६ कोटी लाख झाली असून उत्पन्न ६०० कोटी ८२ लाखांवरून थेट ९१५ कोटी ८० लाख झाले आहे. गेल्या वर्षी मे महिन्यापासून लागू करण्यात आलेल्या या योजनामुळे राज्यात एसटीने प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठय़ा प्रमाणात वाढली असून उत्पन्नात वाढ झाली आहे. मे २०२२ मध्ये एसटीने ९ कोटी ५० लाख (प्रवाशांच्या ये-जा करण्यावर संख्या मोजली जाते) प्रवासी प्रवास करीत होते. विविध ३१ प्रकारच्या सवलतींसाठी राज्य सरकार महामंडळाला १४४९ लाख रुपये देणे लागत आहे. सवलती दिल्याने ही संख्या १६ कोटी लाख झाली असून उत्पन्न ६०० कोटी ८२ लाखांवरून थेट ९१५ कोटी ८० लाख झाले आहे. सरकारने एसटीला बळ देण्यासाठी १,१४४ कोटी रुपये अदा केले आहेत. त्यामुळे एसटीची आर्थिक घडी सुधारण्यास मदत होणार आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत