सत्यशोधक महात्मा फुले…
आजचा दिवस हा ऐतिहासिक दृष्ट्या महत्त्वपूर्ण दिवस आहे..
महात्मा फुले म्हणतात, सत्याच्या वाटेवर चालत असताना एकटे पडलात तरी चालेल परंतु चुकीच्या गोष्टीचे समर्थन करणाऱ्या गर्दी मध्ये मिसळू नका..
छत्रपती शिवारायांची समाधी शोधून त्यांच्यावर पहिला पोवाडा लिहून सत्य समोर मांडणारे सत्यशोधक म्हणजे महात्मा फुले…
शेतकऱ्यांचा आसूड या ग्रंथ द्वारे शेतकऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे सत्यशोधक म्हणजे महात्मा फुले..
गुलामगिरी ग्रंथाद्वारे दलितांवरील अन्यायाला वाचा फोडणारे सत्यशोधक म्हणजे महात्मा फुले..
आपली अधोगती कुठल्या कारणाने झाली आणि प्रगती करायची असेल तर त्यासाठी शिक्षण या शस्त्राची दिशा आपल्यासमोर मांडणारे सत्यशोधक म्हणजे महात्मा फुले..
मुलींना चूल आणि मूल यातून बाहेर काढून हातात लेखन-पाटी देऊन त्यांच्यावरील गुलामीची जाणीव करून देणारे सत्यशोधक म्हणजे महात्मा फुले..
एकटे चालण्याचे सामर्थ्य व अन्यायाविरुद्ध लढा लढण्याची ताकत भारतीयांच्या मनात निर्माण करणारे सत्यशोधक म्हणजे महात्मा फुले..
ब्राम्हणी व्यवस्थेच्या विरोधात बंड करून तमाम ब्राम्हणी व्यवस्थेला घाम फोडणारे सत्यशोधक म्हणजे महात्मा फुले…
अन्यायाचा प्रहार, बहुजनांचे कैवारी, कष्टकरी-शेतकऱ्याचे पुढारी, शिक्षण महर्षी महात्मा फुले यांनी आज रोजी २३ सप्टेंबर १८७३ पुणे सत्यशोधक या संघटनेची स्थापना केली आणि तमाम भारतीयांसमोर खरा इतिहास मांडला. अशा थोर समाज सुधारकास त्रिवार वंदन 🙏🙏
👉🏻मा. अत्तदीप धुळे✍️📘 (सामाजिक कार्यकर्ते, दहागाव)
🖊️9511953580
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत