विद्यार्थी प्रिय शिक्षिका प्रभावती स्वामी यांनी आदर्श विद्यार्थी घडवले :- परांडकर महाराज
नळदुर्ग
दादासाहेब बनसोडे
भावी पिढी घडवण्याची महत्वपूर्ण जबाबदारी शिक्षकावर असते हे लक्षात घेवून शिक्षीका प्रभावती स्वामी यांनी आपल्या ३१ वर्षाच्या सेवाकाळात मातीला आकार देवून सुंदर मूर्ती घडवावी त्याप्रमाणे स्वामी यांनी अनेक आदर्श विद्यार्थी घडवले. आज त्यांचे अनेक विद्यार्थी विविध क्षेत्रात उच्च पदावर कार्यरत आहेत.अशा कर्तव्यदक्ष व प्रामाणिक शिक्षकांची गरज असून स्वामी यांचा हा सेवापूर्ती गौरव सोहळा निश्चितच प्रेरणा देणारा आहे असे प्रतिपादन श्रीषब्र
राचलिंगेश्वर परांडकर महाराज,बार्शी यांनी स्वामी यांच्या गौरव सोहळ्यात बोलताना केले.
*धाराशिव तालुक्यातील बेंबळी येथील सरस्वती विद्यालयातील सेवानिवृत्त शिक्षिका प्रभावती सतीश स्वामी यांच्या सेवानिवृत्ती निमित्त रविवार दि.२२ रोजी नामानंद मंगल कार्यालयात सेवापूर्ती गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी परांडकर महाराज हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून जंगम समाज जिल्हा समन्वयक त्र्यंबक कपाळे, सपोनी पांडुरंग माने, संस्था अध्यक्ष अनीलआण्णा गिरवलकर, वैद्यकीय अधिकारी रोहित राठोड, दमयंती महिला शिक्षण संस्था
नळदुर्गच्या अध्यक्षा सुभद्राताई मुळे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. सरस्वती प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलन करून सोहळ्यास प्रारंभ करण्यात आला. मान्यवरांच्या उपस्थितीत परांडकर महाराज यांच्या शुभहस्ते स्वामी दाम्पत्याचा सन्मान करून त्यांना
शुभाशिर्वाद देण्यात आले. यावेळी अणदूर येथील त्यांचे बंधू पत्रकार राजेंद्र स्वामी व कुटुंबियांच्या वतीने शाल,श्रीफळ,पुष्पहार, पुष्पगुच्छ,भरपेहराव व सोन्याची मुद्रिका देवून उभयतांचा गौरव करण्यात आला. यावेळी त्र्यंबक कपाळे,गिरवलकर आण्णा,सुभद्राताई मुळे व राजेंद्र स्वामी यांनी आपल्या मनोगतात शिक्षिका स्वामी यांनी अत्यंत शिस्तीत व प्रामाणिक पणे आपली सेवा बजावली यामुळेच आज त्यांचे अनेक विद्यार्थी उच्च पदावर कार्यरत असल्याचे सांगून त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. सत्काराला उत्तर देताना स्वामी यांनी मी विद्यार्थी ही आपली मुले आहेत याच भावनेतून प्राधान्याने ज्ञानदान केले तर माझ्या अडचणींना दुय्यम स्थान दिले. मी पगार घेत आहे हे कायम लक्षात ठेवून माझे कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडले इतकेच! आपण सर्वांनी माझे तोंडभरून कौतूक केले,अपेक्षेपेक्षा मोठ्या संख्येनी पदरमोड करून उपस्थित राहिलात हीच माझ्या कार्याची पावती आहे. मुले ही देवाघरची फुले आहेत याच भावनेने काम केले यापुढेही शक्यतो सहकार्य करणार हाच माझ्या जीवनातला खरा आनंद आहे या शब्दात आपल्या भावना व्यक्त करताना त्यांचा कंठ दाटून आला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक काशिनाथ आरळे यांनी केले तर सूत्रसंचालन शिभप उमाशंकर मिटकरी यांनी मोठ्या खुमासदार शब्दात करून सर्वांना मंत्रमुग्ध केले. या कार्यक्रमास सेवानिवृत्त न्यायाधीश भिमाशंकर भडंगे, प्रशासकीय अधिकारी काका शिंदे, संस्था उपाध्यक्ष पांडुरंग व्हनसनाळे, मन्मथअप्पा गिरवलकर,अँड विजयकुमार भोसले, माजी पंस सदस्य संजय गिरवलकर, प्रवीण स्वामी सर आदी मान्यवरासह मित्र मंडळी, नातेवाईक व ग्रामस्थ मोठ्या संख्येनी उपस्थित होते. पत्रकार राजेंद्र स्वामी यांच्या आभाराने या कार्यक्रमाची सांगता झाली.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत