नळदुर्ग येथे राजपुत समाज बांधवासाठी सभागृह व संरक्षक भिंतीसाठी निधी उपलब्द करून द्यावी असे आ.राणा पाटील यांच्याकडे साकडे. –दादासाहेब बनसोडे (नळदुर्ग)
दि. २१. नळदुर्ग येथील माऊली नगर मधील लोकमान्य हाऊसिंग सोसायटीच्या ओपन स्पेस मधील शिल्लक असलेल्या जागेत राजपुत समाज बांधवांसाठी सभागृह व वॉल कंपाउंडचे बांधकाम करून द्यावे अशी मागणी नळदुर्ग शहर राजपुत समाज मंडळाने तुळजापूर चे लोकप्रीय आमदार राणा जगजितसिंह पाटील यांना दिलेल्या निवेदनाद्वारे साकडे घातले आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, नळदुर्ग येथील माऊली नगर मधील लोकमान्य हाऊसिंग सोसायटीमध्ये गेल्या ३० वर्षांपासुन राजपुत समाज राहत आहे. या हाऊसिंग सोसायटीच्या ओपन प्लेस मध्ये जी शिल्लक जागा आहे त्या जागेवर राजपुत समाजासाठी सभागृह तसेच वॉल कंपाउंडचे बांधकाम करून द्यावे. या जागेची नोंद नगरपालिकेच्या दप्तरी असुन त्यामुळे याठिकाणी बांधकाम करण्यासाठी कुठलीच अडचण येणार नाही. सभागृह हे जनहितार्थ असल्यामुळे त्या ठिकाणी राहणाऱ्या नागरीकांना याचा उपयोग होणार आहे. त्यामुळे आपण या कामासाठी लागणारा निधी उपलब्ध करून द्यावे अशीही मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. या निवेदनावर शहर राजपुत समाजाचे अध्यक्ष सुधीरसिंग भैया हजारी, उपाध्यक्ष अजयसिंह चंदेले, सरदारसिंग ठाकुर, सचिव मंगेशसिंह चंदेले, सुरेश हजारे,राहुल हजारे, अजित हजारे, मनोज हजारे,जमन ठाकुर,महेश हजारे, शुभम हजारे,पवन चंदेले,सौरभ गहेरवार,संदीप हजारे, अक्षय हजारे,सागर हजारे,सुजित हजारे,विजय ठाकुर, मंगेश चंदेले,अजय चंदेले,दिलीप ठाकुर,प्रताप, हजारे अतुल हजारे व दिनेश हजारे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत
तुळजापूर चे लोकप्रिय आमदार हे लवकरात लवकर नळदुर्ग येथील राजपूत समाजासाठी त्यांच्या कार्यासाठी सभागृह उपलब्ध करून देतील त्याचबरोबर संरक्षण भिंत या दोन्ही कामासाठी निधी उपलब्ध करून देतील अशी अपेक्षा राजपूत समाज बांधवातुन व्यक्त करण्यात आली आहे .
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत