नैऋत्य अरबी समुद्रात कमी दाबाचा तीव्र पट्टा तयार झाला असून त्याचं रुपांतर चक्रीवादळात होण्याची शक्यता भारतीय हवामान शास्त्र विभागानं वर्तवली आहे. या वादळाचा जोर उद्या म्हणजेच रविवारी संध्याकाळपर्यंत वाढू शकतो. तेज नावाचं हे वादळ वायव्येकडे सरकत राहील आणि ओमान तसंच यमनच्या दिशेने जाईल, असं या अंदाजात म्हटलं आहे. याचा परिणाम मुंबईच्या वातावरणावर होऊ शकतो, असा इशारा हवामानशास्त्र विभागानं दिला आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत