दिन विशेषदेशभारतमराठवाडामहाराष्ट्रमुख्यपान

नळदुर्गच्या ऐतिहासिक शहरात भारतीय सैनिकांच्या सन्मानार्थ भव्य तिरंगा रॅली

भारत माता की जय भारतीय सैनिकांचा विजय असो आशा गगण भेदी घोषणांनी नळदुर्ग शहर दुमदुमले

नळदुर्ग
दादासाहेब बनसोडे

भारत देशामध्ये जम्मू काश्मीर या भागा मध्ये पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात सत्तावीस पर्यटक मृत्युमुखी पडले या हल्ल्यानंतर भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तानात घुसून दहशतवादी अड्डे जमीनदोस्त केले
भारतीय सैनिकांना या ऑपरेशन मुळे खूप यश मिळाले आहे भारतीय सैनिकाच्या या यशा नंतर भारतीय सैनिकांच्या सन्मानार्थ ऐतिहासिक नळदुर्ग शहरात भाजपाच्या नेतृत्वाखाली भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते या रॅलीमध्ये शहरातील व परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता
नळदुर्ग या ऐतिहासिक किल्ल्याच्या प्रवेशद्वारापासून ही तिरंगा येथील सुरुवात करण्यात आली. किल्ला गेट पासून निघालेली रॅली क्रांती चौक ऐतिहासिक चावडी चौक महात्मा बसवेश्वर चौक भवानी चौक शास्त्री चौक पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर चौक लोकमान्य वाचनालय नवी बाजारपेठ डॉ बाबासाहेब आंबेडकर संविधान चौक ते धरणे कॉम्प्लेक्स च्या समोर समारोप तिरंगा रॅलीचा समारोप करण्यात आला
रॅलीमध्ये सहभागी झालेल्या नागरीकानी हातात तिरंगा घेऊन भारत माता की जय व वदे मातरम भारतीय जवानाचा विजय आसो आशा गगणभेदी घोषणा देत माजी सैनिकांचा सन्मान केला .
या रॅलीत सहभागी माजी सैनिक प्रकाश रगबले , प्रकाश मोरडे , सुरेश सुरवसे , नरसू दस , दामोदर सोमवंशी , शिवाजी माने , विश्वनाथ हत्ते , शेषेराव राठोड , भारत जाधव , सिद्राम मुळे , लक्ष्मीबाई गायकवाड ,
शिवशरण हत्ते , विलास सुरवसे , परमेश्वर सुरवसे , दिलीप कांबळे ,दिलीप बिराजदार , प्रभाकर भोसले , गुडाप्पा कापसे , संभाजी काळदाते , नळदुर्ग शहर भाजपाचे अध्यक्ष बसवराज धरणे
भाजपाचे सुशांत भुमकर , माजी नगराध्यक्ष उदय जगदाळे , नय्यर जाहागीरदार भाजपा तालुका अध्यक्षा रंजना राठोड , तुळजापूर तालुका कृषी बाजार समितीचे सभापती ॲड अशिष सोनटक्के , भाजपाचे विलास राठोड , ॲड दिपक आलुरे , सिध्देश्वर कोरे , साहेबराव घुगे , माजी नगरसेवक विनायक अहंकारी , निरंजन राठोड आर पी आय चे जिल्हा उपाध्यक्ष बाबासाहेब बनसोडे , निरंजन राठोड , संजय विठ्ठल जाधव , माजी नगरसेवक सुधिर हजारे , किशोर बनसोडे , कल्पनाताई गायकवाड , छमाताई राठोड , शिवसेना शिंदें गटाचे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर घोडके , जेष्ठ पत्रकार विलास येडगे , उत्तम बनजगोळे , दादासाहेब बनसोडे नळदुर्ग शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष सुहास येडगे , बड़ाप्पा कसेकर , अबुअल हसन रजवी यांच्या सह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते .

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!