डॉ. बाबासाहेब आंबेडकर एक प्रवाह न थांबणारे….
विचारमंथन:-
जगातील सर्वात मोठे संविधान देणारे, म्हणून आम्हाला डॉ बाबासाहेब आंबेडकर माहिती आहेत पण मला आज एक विचारायचे आहे की डॉ बाबासाहेब आंबेडकर फक्त तेव्हढ्यापुरतेच मर्यादित आहेत का??? आपल्यापैकी बऱ्याच जणांना तरी तसेच वाटते…. पण डॉ बाबासाहेब आंबेडकर हे महामानव होते हेही आपल्यापैकी बऱ्याच जणांना ठाऊक आहे अन त्यांचे कार्य तर आम्हाला माहीतच आहे…. मी बरेच वेळा लिहताना कोणत्याही महापुरुषांनी काय केले हे लिहण्याचे टाळते कारण ते आम्हाला ठाऊक असतच पण जे आम्हाला ठाऊक नाही किंवा आम्ही त्यांच्यापासून काय घेऊ शकतो हे सांगण्याचा माझा नेहमी प्रयत्न असतो. आज ही अशाच महामानव बद्दल बोलणार आहे… ज्यांनीआम्हाला संविधान दिले पण तेच संविधान आम्हाला कितपत माहीत आहे?? तर उत्तर बऱ्यापैकी जणांना माहीत नसेल. अर्थात मी कोणी तज्ञ नाही. मला पण तुमच्या एवढे माहीत आहे पण मला अजून जाणुन घेण्याबद्दल कुतूहल आहे. कोणी माहिती पाठवली व मी ती माहिती वाचून दुसऱ्याला forword केली हेच आम्हाला येत पण त्याबद्दलची शहाणीशा आम्हाला करता येत नाही म्हटल्यापपेक्षा आम्हाला त्यामद्ये आवडच नाही.
कोणी म्हणत डॉ बाबासाहेब आंबेडकर फक्त बौद्ध धर्मियांचे पण आपल्याला हे ठाऊक नाही की त्यांनी कोण्या एक जातीसाठी कार्य केले नाही की कोण्या एक जातीला हक्क मिळवून दिले नाही . त्यांना फक्त एकच जात माहिती होती अन ती म्हणजे” माणुसकी”.
महाड चा चवदार तळे सत्याग्रह आम्हाला दिसतो पण तो का केला त्याचे कारण फक्त अस्पृश्याना पाणी देण्यासाठी केला का???तर नाही त्यांनी हा सत्याग्रह माणुसकी वर लागलेला कलंक टाळण्यासाठी केला होता. पाणी साठी नव्हे तर सगळयांना शिकताना समानता मिळावी, नोकरी मद्ये समान संधी मिळावी, त्यांना सुद्धा इतर भारतीय नागरिकप्रमाणे अधिकार मिळावे यासाठी चा हा सत्याग्रह होता.पण आम्ही फक्त एकाच बोटाला धरून ठेवतो. मग आम्हाला बाबासाहेब फक्त अस्पृश्यांचे कैवारी एवढच दिसत….
मंदिरात प्रवेश का नाही??? यावर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी सत्याग्रह केला. हा सत्याग्रह फक्त अस्पृश्याना मंदिरामध्ये प्रवेश मिळावा यासाठी च नव्हे तर कोणत्याही दैवताला कोणीही हात लावले तर मूर्ती अपवित्र होत नाही हा त्यामागील मूळ उद्देश होता.डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी फक्त यासाठीच कार्य केले असे नाही तर सर्व शेतकऱ्यांसाठी सुद्धा मोलाचे योगदान दिले. . बाबासाहेब आंबेडकर यांच्या काही संकल्पनातूनच कमाल जमीनधारणा कायदा, सावकारी व खोती पद्धतींना प्रतिबंध करणारा कायदा, सामूहिक शेतीचे प्रणालीवर आधारित शेती महामंडळ, राज्यातील नद्यांच्या खोर्यांची विभागणी व विकास, जलसंवर्धन योजना अमलात आल्या. शासनाने त्याबाबत कायदे व नियम बनविले. यामागे डॉ. बाबासाहेब यांच्या विचारांचाच प्रभाव दिसून येतो. सोबतच डॉ बाबासाहेब आंबेडकर हे स्त्रीमुक्तीचे पक्के समर्थक होते. त्यांच्यावर तथागत गौतम बुद्धांच्या शिकवणुकीचा आणि महात्मा जोतिबा फुलेंच्या कार्याचा प्रभाव होता. अर्थात बाबासाहेबांचे” हिंदू कोड बिल” सगळ्यांना ठाऊक आहेच. त्यातच डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी स्त्रियांसाठी काय केले आहे ते आपल्याला लक्षात येते.. म्हणून आम्ही जे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना एकाच धाग्यात धरून ठेवल आहे ते चुकीचे आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य अवर्णनीय आहे त्यामुळे फक्त एकाच बाजूने विचार करणे चुकीचे आहे.
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्वांसाठी कार्य केले व म्हणून ते अजरामर झाले हे वेगळे काही सांगण्याची गरज नाही…त्यामुळे त्यांचे कार्य सांगण्यास हा लेख खूप छोटा आहे.. अन माझी लेखणी पण ….पण आपण अर्धवट समजून न घेता सखोल अभ्यासने गरजेचे असते..म्हणून आज मुद्दाम या विषयावर बोलावेसे वाटले…..
विनम्र अभिवादन 🙏🙏
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत